मालगाव येथील शेतकऱ्याच्या बेदाण्याला सांगली-तासगावपेक्षा जास्त भाव, वाशी बाजार समितीमध्ये प्रथमच सौदे

By संतोष भिसे | Published: March 10, 2023 07:07 PM2023-03-10T19:07:03+5:302023-03-10T19:08:45+5:30

या सौद्यांमध्ये बेदाण्याला सांगली व तासगावपेक्षा प्रतिकिलो ५० ते ६० रुपये जास्त भाव मिळाला

351 rupees per kg for currants of a farmer in Malgaon in Sangli, First time deals in Vashi market committee | मालगाव येथील शेतकऱ्याच्या बेदाण्याला सांगली-तासगावपेक्षा जास्त भाव, वाशी बाजार समितीमध्ये प्रथमच सौदे

मालगाव येथील शेतकऱ्याच्या बेदाण्याला सांगली-तासगावपेक्षा जास्त भाव, वाशी बाजार समितीमध्ये प्रथमच सौदे

googlenewsNext

सांगली : मालगाव (ता. मिरज) येथील शशिकांत कनवाडे या द्राक्ष बागायतदाराच्या बेदाण्याला वाशी येथील सौद्यामध्ये प्रतिकिलो ३५१ रुपये दर मिळाला. एसके ४२ वाणाचा गोल बेदाणा त्यांनी सौद्यासाठी आणला होता.

वाशी बाजार समितीमध्ये गुरुवारी प्रथमच बेदाण्याचे सौदे सुरु करण्यात आले. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, द्राक्ष बागायतदार संघ आणि ड्याफ्रुट, डेटस् असोसिएशनचे अध्यक्ष विजय भुता, डाळिंब अडते असोसिएशनचे सचिव नामदेवराव बजबळकर यांना पुढाकार घेतला. सौद्यावेळी बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे, सांगली विभागीय अध्यक्ष संजय बरगाले, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.

या सौद्यांमध्ये बेदाण्याला सांगली व तासगावपेक्षा प्रतिकिलो ५० ते ६० रुपये जास्त भाव मिळाला. वाशीमधील सौद्यामुळे मुंबईतील व्यापाऱ्यांना सांगली, तासगावमधून बेदाणा मागवण्याची गरज राहिलेली नाही. जवळच उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादकांनी वाशी समितीमधील सौद्याचा लाभ घेण्याचे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाने केले आहे.

Web Title: 351 rupees per kg for currants of a farmer in Malgaon in Sangli, First time deals in Vashi market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली