सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ, बुद्ध पौर्णिमेला झाली वन्यप्राणी गणना 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 02:44 PM2023-05-09T14:44:23+5:302023-05-09T14:44:44+5:30

मागील वर्षी ५४ मचानींवर एकूण ३०८ वन्यप्राण्याची नोंद करण्यात आली होती

374 wild animals seen in Sahyadri Tiger Reserve, wildlife count conducted on Buddha Purnima | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ, बुद्ध पौर्णिमेला झाली वन्यप्राणी गणना 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ, बुद्ध पौर्णिमेला झाली वन्यप्राणी गणना 

googlenewsNext

गंगाराम पाटील 

वारणावती : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या "निसर्गानुभव कार्यक्रम २०२३" अंतर्गत पार पडलेल्या मचाणावरील वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना एकुण ३७४ वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. 'निसर्गानुभव' निमित्त निवडण्यात आलेल्या ६० निसर्गप्रेमींना-कोयना, बामणोली, चांदोली, ढेबेवाडी आणि हेळवाक या वन परिक्षेत्रांतील जंगलातील ६० मचानावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली. यावेळी बिबट्यासह एकुण १८ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच १० वन्य पक्षी प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले.

निसर्गानुभव' मध्ये सहभागी होण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी याबरोबरच नाशिक, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. सहभागी निसर्गप्रेमींनी निसर्गानुभव कार्यक्रम व त्याकरिता दिलेल्या सोईसुविधांबाबत संतुष्टता व्यक्त केली. विशेष म्हणजे सर्व मचाणींवर वन्यप्राण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दर्शन घडले. रात्रभर जागे राहून पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची नोंद निसर्गप्रेमींकडून करण्यात आली. यानोंदीनुसार ६० मचाणींवर एकुण ३७४ वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. त्याची माहिती सहपत्रीत केली आहे. मागील वर्षी ५४ मचानींवर एकूण ३०८ वन्यप्राण्याची नोंद करण्यात आली होती.

निसर्गानुभव कार्यक्रम २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज २५ एप्रिल २०२३ पासून www.mahaforest.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आले होते. सामान्य नागरिकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून त्यांना निसर्गाची अनुभूती घेता यावी, रात्रीचे जंगल, वन्य प्राण्यांचे आवाज, निशाचर प्राण्यांची वर्तणुक इत्यादी रंजक माहिती मिळावी या उद्देशाने या वर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे "निसर्गानुभव कार्यक्रम - २०२३ राबविण्यात आला होता.

एकूण क्षेत्रफळ ११६५.५७ चौ. किमी

०५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ११६५.५७ चौ. किमी. आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे. येथील जंगल हे सह्याद्रीतील उर्वरीत घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करीत आहे. १५ नद्यांचा उगम या जंगलातून होतो.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले "जागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. तसेच Birdlife International या जागतिक संस्थेने 'Important Bird Area' म्हणून घोषित केले आहे. येथील जैवविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे.अशी महिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत यानी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

वन्यप्राणी दर्शन 

बिबट्या/फ्रेअर ३,भारतीय गौर १५ ,
सांबर हरण १० ,ठिपकेदार हरीण ४,
जंगली कुत्रा ८ ,जंगली डुक्कर १०३,
भारतीय हरे १ ,उंदीर हरण / पिसोरी गेळा २ ,बार्किंग डियर १५,आळशी अस्वल २०,
लहान भारतीय सिव्हेट ४,राखाडी लंगूर ८,बोनेट मॅक ७,इंडियन क्रेस्टेड पोर्क्युपिन ३,भारतीय मुंगूस  १,शेखरू १४,
वटवाघूळ १ ,जंगली उंदीर  १, एकूण-३१७ 

पक्षी प्रजाती दर्शन 

 ब्राह्मणी पतंग/आर १,स्परफाऊल १,
रानकोंबडा ३१ , घुबड २,शिक्रा/टी १,
घार २ ,बटेर ३, भारतीय मोर १३,
सर्प गरुड / ड्रॅग १ 
एकूण पक्षी -५७

Web Title: 374 wild animals seen in Sahyadri Tiger Reserve, wildlife count conducted on Buddha Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.