जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच, ३९७ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 06:51 PM2022-01-13T18:51:51+5:302022-01-13T18:52:28+5:30

जिल्ह्यात तीन दिवसांत हजारावर रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. 

397 patients tested positive for corona In Sangli district | जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच, ३९७ रुग्णांची भर

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच, ३९७ रुग्णांची भर

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख वर चढतच असून आज, गुरुवारी दिवसभरात तब्बल ३९७ बाधित आढळले. तीन दिवसांत हजारावर रुग्ण जिल्ह्यात आढळल्याने चिंता वाढली आहे. 

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सांगली, मिरज शहरात आढळत आहेत. गुरुवारी सांगलीत ७१ तर मिरजेत ६६ रुग्ण आढळून आले. तालुक्यामध्ये सर्वाधिक ५१ रुग्ण वाळवा तालुक्यात आढळले. सर्वच तालुक्यात कोरोनाबाधित सापडत आहेत.

आटपाडीत १७, जतमध्ये १६, कडेगावमध्ये २५, कवठेमहांकाळला ०५, खानापूरला १९, मिरज तालुक्यात ४०, पलूस तालुक्यात ०९, शिराळ्यात ३५, वाळवा तालुक्यात ५१, तासगाव तालुक्यात ४३ रुग्ण आढळले. 

सध्या उपचाराखालील रुग्णांची संख्या १२६२ इतकी असली तरी त्यातील १६०७ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. रुग्णालयात दाखल बाधितांची संख्या सध्या कमी आहे. मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील कोविड रुग्णालयात ५७ तर मिरजेच्या  सिनर्जी रुग्णालयात २३ असे एकूण ८० रुग्ण उपचार घेत आहेत.

Web Title: 397 patients tested positive for corona In Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.