जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४० रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:10 AM2020-12-05T05:10:40+5:302020-12-05T05:10:40+5:30

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४० नवे रुग्ण आढळून आले, तर सांगलीतील एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात ४८ जणांनी कोरोनावर ...

40 new corona patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४० रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे नवे ४० रुग्ण

Next

सांगली : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे ४० नवे रुग्ण आढळून आले, तर सांगलीतील एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात ४८ जणांनी कोरोनावर मात केली. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असून, ४०० जण उपचाराखाली आहेत.

महापालिका क्षेत्रात शुक्रवारी मिरजेत केवळ एका रुग्णाची नोंद झाली. आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी ३, वाळवा, कडेगाव तालुक्यात प्रत्येकी ७, तर तासगाव तालुक्यात सर्वाधिक १० रुग्ण आढळून आले. पलूस व मिरज तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, सांगली शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या ३७० चाचण्या करण्यात आल्या. त्यात ६ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १५४९ चाचण्यांत ३५ रुग्ण सापडले. सध्या ८९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ऑक्सिजनवर ६७, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ६, नाॅन इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर १४, तर इन्व्हेजीव व्हेंटिलेटरवर २ जण आहे. सध्या जिल्ह्यातील ४०० व परजिल्ह्यातील २८ जणांवर उपचार सुरू आहेत.

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

आजचे रुग्ण : ४०

उपचाराखालील रुग्ण : ४००

आजअखेर बरे झालेले रुग्ण : ४४,८५१

मृत्यू : १७०१

आजअखेरचे एकूण रुग्ण : ४६,९५२

चिंताजनक : ८९

Web Title: 40 new corona patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.