व्यापाऱ्यांना आकारलेला ४० पट दंड रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:13+5:302021-03-26T04:26:13+5:30
सांगली : श्यामरावनगर, शंभर फुटीरोड, कोल्हापूररोड तसेच अन्य ठिकाणच्या व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसाद्वारे आकारलेला ४० ...
सांगली : श्यामरावनगर, शंभर फुटीरोड, कोल्हापूररोड तसेच अन्य ठिकाणच्या व्यापारी व छोट्या व्यावसायिकांना अप्पर तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसाद्वारे आकारलेला ४० पट दंड माफ करावा, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याकडे केली.
शहरातील छोटे व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांना वाणिज्य व बिगर शेती जागेच्या वापराबाबत नोटिसा दिलेल्या आहेत. त्याद्वारे त्यांना कराच्या ४० पट दंड आकारण्यात आला आहे. या नोटिसा आल्यामुळे व्यापाऱ्यांनी पृथ्वीराज पाटील यांची भेट घेऊन दंड माफ करण्याची मागणी केली. त्यानुसार आज त्यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांच्याशी चर्चा केली. व्यापाऱ्यांना केलेला ४० पट दंड माफ करावा, अशी मागणी पाटील यांनी या बैठकीत केली. त्याबाबतचे निवेदनही अधिकाऱ्यांना दिले. या मागणीसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन समीर शिंगटे यांनी दिले.