डोंगरावर पाच वर्षात ४000 रोपे- गुड न्यूज-ठिबकने पाणी : किल्लेमच्छिंद्रगड येथील अवलियाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:32 PM2018-08-21T23:32:55+5:302018-08-21T23:33:22+5:30

4000 seedlings in five years on the hill- Good news-dribble water: Avalya initiative in Killemachandrargad | डोंगरावर पाच वर्षात ४000 रोपे- गुड न्यूज-ठिबकने पाणी : किल्लेमच्छिंद्रगड येथील अवलियाचा उपक्रम

किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे सभापती सचिन हुलवान यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सुहास पाटील, सिकंदर जमादार, हणमंतराव मोरे, शिवकुमार पाटील, राहुल पाटील उपस्थित होते.

googlenewsNext

निवास पवार ।
शिरटे : सुमारे चार हजार वृक्षांची लावण, वृक्षसंगोपनासाठी स्वखर्चाने किल्लेमच्छिंद्रगड डोंगरमाथ्यापर्यंत पाईपलाईन, डोंगरावरच पाण्याच्या टाकीचे बांधकाम, यातून २५०० रोपांना ठिबकने पाणी. ही धडपड आहे किल्लेमच्छिंद्रगडातील एक अवलियाची. शिवकुमार पाटील हे त्याचे नाव.

किल्लेमच्छिंद्रगडावर (ता. वाळवा) पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गडवड, पिंपळ, जांभूळ, साग, पायरन, चिंच, आवळा, सीताफळ आदी देशी वाणाच्या सुमारे चार हजार रोपांची लावण केली आहे. वृक्ष संगोपनासाठी आमदार जयंत पाटील यांनी २०० फुटापर्यंत कूपनलिका खुदाई करुन दिली होती. परंतु हे पाणी सर्व झाडांना पुरत नव्हते. नंतर शिवकुमार पाटील यांनी स्वखर्चाने वाढीव कूपनलिका खुदाई केली. तेथून वरपर्यंत पाईपलाईन केली. डोंगरमध्यावर टाकी बांधून २५०० रोपांना ठिबक केले आहे. या उपक्रमाची वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान यांनी पाहणी केली. त्यांच्यासमवेत संतोष इंगवले, प्रकाश साळुंखे, सुहास पाटील, सचिन साळुंखे, हणमंतराव मोरे, सिकंदर जमादार, राहुल पाटील उपस्थित होते.

 

किल्लेमच्छिंद्रगडावर पूर्वी सीताफळाची खूप झाडे होती. परंतु वृक्षतोडीमुळे ती नष्ट झाली. सीताफळाचे गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे, यासाठी पुढील वर्षापासून याठिकाणी सीताफळाची लागवड करणार आहे. बीजांपासून रोपे तयार करण्याचे काम चालू केले आहे.
- शिवकुमार पाटील, किल्लेमच्छिंद्रगड
 

Web Title: 4000 seedlings in five years on the hill- Good news-dribble water: Avalya initiative in Killemachandrargad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.