जिल्ह्यातील ४२११ द्राक्ष निर्यात शेतकऱ्यांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:29 AM2021-02-11T04:29:03+5:302021-02-11T04:29:03+5:30
युरोपमधील देशात निर्यातीसाठी जिल्ह्यातील ४२११ शेतकऱ्यांनी २२६७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी केली होती. या द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून ...
युरोपमधील देशात निर्यातीसाठी जिल्ह्यातील ४२११ शेतकऱ्यांनी २२६७ हेक्टर क्षेत्रातील द्राक्षांची नोंदणी केली होती. या द्राक्ष निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कंटेनरला दीड लाख रुपये अनुदान मिळत होते. केंद्र सरकारने ते बंद केल्यामुळे निर्यातदारांमध्ये खळबळ उडाली आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू असताना अचानक केंद्र सरकारने ही भूमिका घेतल्यामुळे निर्यातदार द्राक्ष उत्पादक चिंतेत सापडले आहेत.
युरोपमध्ये निर्यात द्राक्षाला सरासरी प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपये, तर आखाती देशात ६० ते ८५ रुपये दर मिळतो. सध्या तेवढा दर मिळत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादक चिंतेत आहे. सध्या जिल्ह्यात युरोपसह बांगलादेश, ओमान, दुबईसाठी द्राक्ष खरेदी करणारे व्यापारी दाखल झाले आहेत.
चौकट
निर्यातदार, शेतकरी खासदारांना भेटणार
केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातीसाठीचे बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील निर्यातदार आणि निर्यातदार द्राक्ष उत्पादक खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर भूमिका मांडणार आहेत.