दारू दुकाने बंदमुळे ‘महसूल’ला ४३ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:02 AM2018-04-30T00:02:31+5:302018-04-30T00:02:31+5:30
सचिन लाड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महामार्गावरील दारू दुकाने बंद झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाला सुमारे ४२ कोटी ४४ लाख ३१ हजाराचा फटका बसला आहे. दारू विक्रीतही २४ लाख ७६ हजार लिटरने घट झाली. पण गृहविभागाच्या आदेशामुळे जिल्ह्यातील बहुतांश दुकाने पुन्हा सुरू झाल्याने यावर्षीपासून शासनाची तिजोरी पुन्हा भरणार आहे.
राज्य शासनाकडून उत्पादन शुल्क विभागाला प्रत्येकवर्षी महसूल उद्दिष्ट दिले होते. गतवर्षी दारुची दुकाने बंद झाल्यानंतर ३७२ कोटी २० लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण दुकाने बंद झाल्याने उत्पादन शुल्कला हे उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही. जिल्ह्यात यावर्षी बहुतांश दुकाने सुरु झाल्याने आता महसूलचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडचण नाही.
२०१७-१८ मध्ये प्रतिमाह मिळालेला महसूल...
एप्रिल २०१७ : ११ कोटी ९१ लाख ४१ हजार ६८३ रुपये.
मे २०१७ : २० कोटी ९० लाख ५६ हजार २७२.
जून २०१७ : २० कोटी ७७ लाख ९१ हजार ४२६.
जुलै २०१७ : २५ कोटी १७ लाख ६९ हजार ६२४.
आॅगस्ट २०१७ : १५ कोटी ८५ लाख ६९ हजार ७८३.
सप्टेंबर २०१७ : २२ कोटी ९ लाख ३१ हजार ४१०.
आॅक्टोबर २०१७ : २४ कोटी ९७ लाख ७० हजार ३९७.
नोव्हेंबर २०१७ : २८ कोटी १६ लाख १९ हजार ८६१.
डिसेंबर २०१७ : ३१ कोटी ५२ लाख ८० हजार ९१९.
जानेवारी २०१८ : १९ कोटी ११ लाख ५६ हजार ५२९.
फेब्रुवारी २०१८ : २३ कोटी ४३ लाख १७ हजार ६९९.
मार्च २०१८ : ३२ कोटी ५४ लाख ७५ हजार ५९३.
एकूण : २७६ कोटी ४८ लाख ८१ हजार १९९ रुपये