सोयाबीनला ४३५० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:04 AM2020-12-05T05:04:14+5:302020-12-05T05:04:14+5:30
-- गुळाचे दर वाढणार कधी? सांगली : कोल्हापुरी गुळाला प्रति क्विंटल तीन हजार १०० ते चार हजार ११ रुपये ...
--
गुळाचे दर वाढणार कधी?
सांगली : कोल्हापुरी गुळाला प्रति क्विंटल तीन हजार १०० ते चार हजार ११ रुपये दर मिळाला आहे. सरासरी तीन हजार ५५६ रुपये दर मिळाल्यामुळे शेतकरी आणि गूळ उत्पादक चिंतेत सापडला आहे. गुळाचे दर कधी वाढणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. मंगळवारी एक हजार ९९५ क्विंटल, तर एप्रिल ते आजअखेरपर्यंत तीन लाख ५९ हजार ६३ क्विंटल गुळाची आवक झाली होती.
--
माधवनगरमध्ये औषध फवारणीची मागणी
सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील गटारींची अवस्था बिकट आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. गटारींची नियमितपणे स्वच्छता करावी, तसेच डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.
--
छोट्यांच्या आजारात वाढ
पलूस : बदललेले वातावरण आणि गारठ्यामुळे चिमुकल्यांच्या आजारात वाढ होत आहे. अनेक बालरुग्णालये सध्या छोट्यांच्या रडण्याने दणाणून गेली आहेत. घरगुती उपचारांबरोबरच औषधांच्या साहाय्याने छोट्यांना लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी पालकांचे प्रयत्न सुरू आहेत.