कारखान्यांकडे ४३९ कोटी अडकले
By admin | Published: December 11, 2015 10:45 PM2015-12-11T22:45:48+5:302015-12-12T00:15:33+5:30
ऊस बिलाचा तिढा : साखरसम्राट-संघटनांच्या संघर्षात शेतकऱ्यांची फरफट; शासनाची बघ्याची भूमिका
अशोक डोंबाळे -- सांगली --जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन दीड-दोन महिने झाले असून, १७ लाख ८८ हजार ७८७ टन उसाचे गाळप झाले आहे. या उसाचे ४३९ कोटी ७५ लाख ७४ हजार ४० रुपयांचे बिल साखर कारखानदारांकडे थकित आहे. शासनाने एफआरपीचा तोडगा काढला नसल्याचे कारण देऊन शेतकऱ्यांना आतापर्यंत एक रूपयाही दिलेला नाही.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम २१ आॅक्टोबर ते १९ नोव्हेंबर या कालावधित सुरू झाला. त्याला जवळपास दीड ते दोन महिने झाले आहेत. वसंतदादा कारखान्याने सर्वाधिक दोन लाख १९ हजार ७७० टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याकडे चालू हंगामातील ५० कोटी ५४ लाख ७१ हजारांचे बिल थकित आहे. राजारामबापू, विश्वास, क्रांती, हुतात्मा साखर कारखान्यांचेही प्रत्येकी ३० ते ५० कोटींचे बिल थकित आहे. जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी ऊस उत्पादकांना एक रुपयाचेही बिल दिलेले नाही. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांची ४३९ कोटी रूपयांची बिले थकित आहेत. याबद्दल शासन, संघटना आणि कारखानदार एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत. कारखानदार मात्र साखरेचे दर स्थिर नसल्यामुळे आणि एफआरपीविषयी शासनाने भूमिका स्पष्ट केली नसल्याने बिल दिले नसल्याचे सांगत आहेत. साखर कारखानदार, शासन आणि संघटनांच्या संघर्षात जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्य सरकारनेही एफआरपीच्या प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याची गरज होती. परंतु, सरकार साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार आहे. सध्या लग्नसराई सुरू असून, घरातील लग्नकार्यासाठी खर्चाला पैसे नसल्यामुळे शेतकरी सावकारांकडून कर्ज घेत आहेत. अनेक शेतकरी कारखानदारांचे उंबरे झिजवत असूनही बिल जमा होत नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडील थकित रक्कम
कारखाना (मे. टन) ऊस गाळपउतारा टक्के थकित रक्कम
वसंतदादा२१९७७०९.६४५०५४७१०००
राजारामबापू (साखराळे)११९७२०११.७१३१८६९४६४०
विश्वासराव नाईक१५५९५०१०.२०३९६४२४९००
हुतात्मा१६४९८५११.५५४२७९६१०००
माणगंगा १६३७०८.३०३४३७७०००
महांकाली५६५६०९.७८१३००८८०००
राजारामबापू (वाटेगाव)११९०९५११.३०३०९६४७०००
डफळे८१८४०९.९२१८८२३२०००
सोनहिरा१५२८६२११.४४३८२१५५०००
क्रांती२०२५६०११.२४५०६४०००००
सर्वोदय९८३८०११.६३२४५९५००००
मोहनराव शिंदे८८९३०१०.९६२१३४३२०००
केन अॅग्रो९२०५०१०.२६२११७१५०००
उदगिरी शुगर१०३४१०११.२२२५८५२५०००
सदगुरु श्री श्री शुगर११६३०५१०.०९२६७५०१५००
एकूण१७८८७८७१०.७८४३९७५७४०४०