‘पीएम किसान’च्या लाभार्थ्यांकडून ४.४१ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:12+5:302021-01-13T05:06:12+5:30

केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना देशभरात सुरू आहे. या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचा ...

4.41 crore recovered from PM Kisan beneficiaries | ‘पीएम किसान’च्या लाभार्थ्यांकडून ४.४१ कोटी वसूल

‘पीएम किसान’च्या लाभार्थ्यांकडून ४.४१ कोटी वसूल

Next

केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान योजना देशभरात सुरू आहे. या योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपयांचा निधी चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात बँक खात्यावर जमा केला जातो. सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ४ लाख ५८ हजार १९० लाभार्थ्यांची नोंदणी झाली. १२ हजार ९४१ आयकर भरणाऱ्यांची यादी शासनाकडून पोर्टलवर मिळाल्याचे स्पष्ट झाले. पी. एम. किसान योजनेंतर्गत आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा कोटी ३९ लाख रुपये भरले होते. त्यापैकी या आयकर भरणाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नोटिसा जाताच जिल्ह्यातील ५२२६ लाभार्थ्यांनी चार कोटी २३ लाख सहा हजार रुपये भरले आहेत. उर्वरित आयकर भरणाऱ्यांना पीएम किसान योजनेतील पैसे भरण्याच्या नोटिसाही प्रशासनाने दिल्या आहेत.

जिल्ह्यातील ४३४५ अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन कोटी १७ लाख २४ हजार रुपये जमा झाले होते. त्यापैकी प्रशासनाकडून नोटिसा मिळताच ३६४ लाभार्थ्यांनी १८ लाख ६२ हजार रुपये शासनाच्या खात्यावर जमा केले आहेत.

चौकट

यांना पीएम किसान योजनेतून वगळले

या योजनेतून घटनात्मक पदावरील व्यक्ती, आजी-माजी लोकप्रतिनिधी, नोकरीतील निवृत्त सरकारी कर्मचारी, करदाते, डॉक्टर, इंजिनीअर्स, वकील, सनदी लेखापाल, गरजू शेतकरी नसलेल्यांना वगळण्यात आले आहे. या व्यक्तींनी लाभ घेतल्यास पैसे परत शासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

चौकट

आयकर, अपात्र लाभार्थींकडून पैसे परत

तालुका आयकर रक्कम अपात्र रक्कम

आटपाडी ४७४ ३७४४००० १ २०००

जत ४९६ ४०१६००० १२ ६८०००

कडेगाव ७८९ ६९६०००० ४० १६६०००

क.महांकाळ ४५३ ३४३४००० ५६ २८००००

खानापूर ५५० ४३९८००० ८ ६४०००

मिरज ३५३ २६४४००० ११७ ५९२०००

पलूस ३२७ २७६८००० ४९ २४००००

शिराळा ३५९ ३१८८००० ७ ३६०००

तासगाव ७१२ ५५६२००० ४३ २४६०००

वाळवा ६१३ ५५९२००० ३१ १६८०००

एकूण ५१२६ ४२३०६००० ३६४ १८६२०००

Web Title: 4.41 crore recovered from PM Kisan beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.