कमल अर्थोपेडिक सेंटरमध्ये शासकीय योजनेतुन ४५० मोफत शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:33+5:302021-06-24T04:18:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जत : जत येथील कमल अर्थोपेडिक सेंटरचे डॉ. कैलास सनमडीकर यांनी कोरोना काळात दीड वर्षात महात्मा ...

450 free surgeries under government scheme at Kamal Orthopedic Center | कमल अर्थोपेडिक सेंटरमध्ये शासकीय योजनेतुन ४५० मोफत शस्त्रक्रिया

कमल अर्थोपेडिक सेंटरमध्ये शासकीय योजनेतुन ४५० मोफत शस्त्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : जत येथील कमल अर्थोपेडिक सेंटरचे डॉ. कैलास सनमडीकर यांनी कोरोना काळात दीड वर्षात महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत आतापर्यंत ४५० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच या रुग्णालयाचे संपूर्ण नूतनीकरण पूर्ण झाल्याची माहिती कमल अर्थोपेडिक सेंटरचे डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली.

२०२० मध्ये कमल अर्थोपेडिक सेंटरला महात्मा फुले योजना सुरू झाली. रुग्णालयअंतर्गत जत येथील उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशनमार्फत सीटी स्कॅन सेंटर सुरू केले. येथे नवीन ३०० एम ए डिजिटल एक्स-रे मशीन व जीई कंपनीचे ब्राईट स्पीड मशीन बाहेर देशातून आयात केले आहे. या सेंटरमध्ये सर्वप्रकारचे आजारांवरील स्कॅनिंग करता येणार आहे.

कोरोनाची महामारी लक्षात घेता, उमाजीराव सनमडीकर मेडिकल फाऊंडेशनने प्रत्येक स्कॅनसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून केवळ नाममात्र दोन हजार रुपये शुल्क आकारले आहे. याचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना होणार आहे.

ट्रॅामा सेंटर, दुर्बिणीतील शस्त्रक्रिया तसेच सांधे बदलीसाठी आवश्यक असणारे मॉड्युलर ऑपरेशन रूम सुसज्ज केली आहे. दोन ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी विभाग, दोन बेड आयसीयू विभाग, सी आर्म आय आय टीव्ही, पोर्टेबल एक्स- रे युनिट, स्पेशल रूम, स्त्री-पुरुष स्वतंत्र वॉर्ड, दोन कन्सलटिंग रूम आदी अत्याधुनिक सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Web Title: 450 free surgeries under government scheme at Kamal Orthopedic Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.