कूपवाडमध्ये घर फोडून ४५ हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:29 AM2021-04-28T04:29:20+5:302021-04-28T04:29:20+5:30
कूपवाड : शहरातील शालिनीनगरमधील स्वप्निल चंद्रकांत पाटील (मूळ गाव अंजनी, ता.तासगाव सध्या रा.प्रकाशनगर, कुपवाड) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप ...
कूपवाड : शहरातील शालिनीनगरमधील स्वप्निल चंद्रकांत पाटील (मूळ गाव अंजनी, ता.तासगाव सध्या रा.प्रकाशनगर, कुपवाड) यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घटनेची नोंद कूपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी स्वप्निल पाटील हे आई, वहिनीसह तिघेजण प्रकाशनगर येथे स्वतःच्या घरात राहतात. हे तिघेजण १४ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत अंजनी मूळ गावी शेती कामानिमित्त गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील रोख रक्कम १५ हजार रुपये, सोन्याची अंगठी, कानातील रिंगा, रेंजर सायकल असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
सोमवारी सकाळी शेजारील व्यक्तींनी पाटील यांना फोन करून सांगितले की, तुमच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कोणीतरी टाकले आहे. पाटील यांनी घरी येऊन घरात पाहिले असता घरात चोरी झाल्याचे दिसून आले. या घटनेची तक्रार त्यांनी कुपवाड पोलिसांत दाखल केली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत.