कामेरी पशुवैद्यकीय रुग्णालयास ४६ लाख निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:21 AM2021-01-09T04:21:57+5:302021-01-09T04:21:57+5:30
कामेरी : कामेरी परिसरातून पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीची गेले अनेक वर्षे मागणी होती. या कामासाठी ४६ लाख ...
कामेरी : कामेरी परिसरातून पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीची गेले अनेक वर्षे मागणी होती. या कामासाठी ४६ लाख रुपये निधी मंजूर झाला असून लवकरच या कामाची निविदा काढण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी दिली.
शिराळा येथे कामेरी (ता. वाळवा) येथील पशुसंवर्धन रुग्णालयासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याबद्दल उद्योजक एम. के. जाधव, शहाजी पाटील, महेश पाटील यांनी माजी आ. शिवाजीराव नाईक यांचा सत्कार केला. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, कामेरीत मागील पाच वर्षांत कामेरी-शिवपुरी रस्ता, सामाजिक सभागृह, पाणंद रस्ते व गावातील अंतर्गत रस्ते डांबरीकरणासह कोट्यवधी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत.
कामेरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीसाठी जागा हस्तांतरणासाठी आलेल्या अनेक अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा जाधव व पंचायत समिती सदस्या सविता पाटील यांनी पाठपुरावा केला होता. यावेळी मणदूरचे सरपंच वसंत पाटील, प्रकाश पाटील उपस्थित होते.
फोटो-०८कामेरी१
फोटो ओळ : कामेरी (ता. वाळवा) येथे पशुसंवर्धन रुग्णालयास ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबद्दल माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचा एम. के. जाधव यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शहाजी पाटील, महेश पाटील उपस्थित होते.