नवरत्न पतसंस्थेला ४८ लाख ढोबळ नफा : सचिन चौगुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:25 AM2021-04-14T04:25:10+5:302021-04-14T04:25:10+5:30
आष्टा : आष्टा येथील नवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्चअखेर ९८ टक्के कर्ज वसुली केली आहे. संस्थेला ...
आष्टा : आष्टा येथील नवरत्न नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्चअखेर ९८ टक्के कर्ज वसुली केली आहे. संस्थेला आर्थिक वर्षात ४८ लाख रुपये ढोबळ नफा झाला आहे अशी माहिती अध्यक्ष सचिन चौगुले यांनी दिली.
चौगुले म्हणाले, सभासदांचा संस्थेवर असलेला विश्वास व कोरोना संकटातही सर्वांनी सहकार्य केल्याने संस्थेची ९८ टक्के कर्ज वसुली झाली आहे. संस्थेचे भागभांडवल ५६ लाख ३८ हजार, निधी १ कोटी ६० लाख, ठेवी १३ कोटी ३४ लाख, कर्ज १० कोटी २ लाख, गुंतवणूक ५ कोटी ९३ लाख, ढोबळ नफा ४८ लाख,
नेट एन पी ए शून्य टक्के असून
समाजातील सर्व घटकांना आर्थिक उभारी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून होत आहे. १६ वर्षाच्या कालखंडात ११ वेळा आदर्श पतसंस्था म्हणून पुरस्कार मिळाला आहे. यावेळी उपाध्यक्ष संतोष थोटे व सचिव प्रमोद कोरेगावे यांच्यासह सर्व संचालक व कर्मचारी उपस्थित होते.