बलात्काराच्या घटना वाढल्या; लॉकडाऊन कालावधीत गुन्ह्यांमध्ये ४९ टक्के घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 11:37 AM2020-06-01T11:37:41+5:302020-06-01T11:39:38+5:30

लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षीपेक्षा बलात्काराच्या घटनांत वाढ झालेली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यातही विविध प्रकारचे ६०० गुन्हे घडले होते. यंदा लॉकडाऊनमध्ये त्यातही घट झाली आहे. लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक गुन्हे मे महिन्यात घडले आहेत.

49% reduction in crime during lockdown period | बलात्काराच्या घटना वाढल्या; लॉकडाऊन कालावधीत गुन्ह्यांमध्ये ४९ टक्के घट

बलात्काराच्या घटना वाढल्या; लॉकडाऊन कालावधीत गुन्ह्यांमध्ये ४९ टक्के घट

Next
ठळक मुद्दे एप्रिल महिन्यात २३४ गुन्हे

शरद जाधव

सांगली : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व त्याचा प्रार्दूभाव वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांच्या प्रमाणात मात्र कमालीची घट झाल्याचे चित्र दिसून आले. सध्या लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्याने गुन्हे पुन्हा वाढले असलेतरी गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात व या एप्रिलमधील गुन्ह्यांचा विचार करता ४९ टक्के गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. गेल्यावर्षी विविध प्रकारचे ४७८ गुन्हे घडले होते तर यंदा एप्रिलमध्ये २३४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाने चार टप्प्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केले होते. त्यातील पहिले दोन टप्पे अधिक काटेकोरपणे पाळण्यात आल्याने रस्त्यावर गर्दी तुरळक होती शिवाय सर्व व्यवहारही बंद होते. त्यामुळे या कालावधीत गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षीपेक्षा बलात्काराच्या घटनांत वाढ झालेली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यातही विविध प्रकारचे ६०० गुन्हे घडले होते. यंदा लॉकडाऊनमध्ये त्यातही घट झाली आहे. लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक गुन्हे मे महिन्यात घडले आहेत.


सायबर गुन्ह्यात वाढ
लॉकडाऊन कालावधीत कोरोनाविषयक अफवा पसरविणारे संदेश सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली होती. सायबर सेलने याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. तरीही कोरोनाबाबत चूकीची व समाजात गैरसमज निर्माण होईल अशी माहितीची पोस्ट टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये १३ सायबरविषयक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


गुन्ह्यांचा प्रकार एप्रिल २०१९ एप्रिल २०२० घट/वाढ (टक्के)
खून ३ ३ ०
खूनाचा प्रयत्न २३ ४ -८३
बलात्कार ६ ९ दिडपट वाढ
दरोडा ३ ० -१००
जबरीचोरी १२ २ -८४
घरफोडी २७ १६ -४१
चोरी ९४ २९ -६९
गर्दी करणे २६ २२ -१६
अपहरण २५ ३ -८८
फसवणूक १८ ४ -७८
दुखापत ११२ ८१ -२८
विनयभंग २१ १० -५३
इतर गुन्ह्यांसह
एकूण ४७८ २३४ -४९

Web Title: 49% reduction in crime during lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.