सराफ बाजारपेठेत ८० टक्के व्यवहार ठप्प : कामगार, गलाई बांधवांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:56 PM2020-03-20T17:56:57+5:302020-03-20T17:58:53+5:30
सांगलीच्या सराफ पेठेत जिल्'ाच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, अशी आशा असलेल्या व्यावसायिकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.
सांगली : कोरोनाच्या धास्तीने शहरातील बहुतांश व्यवसाय बंद होत आहेत. या विषाणूचा परिणाम सराफ बाजारावरही दिसून येत आहे. सराफ कट्टा परिसरात सध्या शुकशुकाट असून, अगदीच गरज असणारे ग्राहकच दुकानात येत आहेत. जवळपास ८० टक्के व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दररोज कोट्यवधींचा फटका सराफ व्यावसायिकांना बसत आहे.
सांगलीच्या सराफ पेठेत जिल्'ाच्या ग्रामीण भागासह कर्नाटक व जयसिंगपूर परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने येत असतात. मार्च महिन्यात फारसे विवाह मुहूर्त नसले तरी, एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात मुहूर्त आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात सोन्या-चांदीची खरेदी होईल, अशी आशा असलेल्या व्यावसायिकांना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे सध्या बाजारपेठेत शुकशुकाट आहे. ग्राहकांनी सराफ पेठेकडे पाठ फिरविली आहे.
गेल्या पंधरा दिवसात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार झाले. मध्यंतरी सोन्या-चांदीचे दर उतरूनही खरेदीसाठी ग्राहक घराबाहेर पडला नाही. व्यावसायिकांच्या मते, जवळपास ८० टक्के व्यवहार ठप्प झाला आहे. सांगलीच्या सराफ पेठेत दररोज ८ ते १० कोटीची उलाढाल होते. आता ही उलाढाल २० टक्क्यावर आली आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर संपूर्ण सराफ पेठच बंद ठेवावी लागणार आहे. गुढीपाडवा व त्यानंतर एप्रिल महिन्यातील विवाह मुहूर्तालाही सोन्या-चांदीची खरेदी होईल की नाही, याची धास्ती व्यावसायिकांना लागली आहे. सराफ पेठेत सन्नाटा पसरल्याने, या व्यवसायावर अवलंबून असलेले कारागीर, कामगार, गलाई बांधवांची आर्थिक कोंडी होणार आहे.
कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकटाशी सामना करण्यासाठी सराफ व्यावसायिकांचे प्रशासनाला सहकार्य राहणारच आहे. कोरोनामुळे सध्या सराफ पेठेत शुकशुकाट आहे. आधीच सराफ व्यावसायिक विविध अडचणींना तोंड देत आहेत. त्यातच या नव्या संकटाची भर पडली आहे. ग्राहकांनी गर्दी टाळून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
- पंढरीनाथ माने, सचिव, सराफ असोसिएशन