मिरजेत ५० बेडचे 'हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ रुग्णसेवेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:05+5:302021-05-27T04:29:05+5:30

सांगली : मिरज येथील सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या युनिटचे (हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल) शासनमान्य डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर रुग्णांच्या सेवेत ...

50-bed HealthPoint Multispeciality Hospital in Miraj | मिरजेत ५० बेडचे 'हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ रुग्णसेवेत दाखल

मिरजेत ५० बेडचे 'हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ रुग्णसेवेत दाखल

Next

सांगली : मिरज येथील सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दुसऱ्या युनिटचे (हेल्थपॉईंट मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल) शासनमान्य डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगली तसेच अन्य जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शासनाने होम आयसोलेशन बंद केल्यामुळे रुग्णांना घरी न राहता कोविड केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घ्यावे लागणार आहेत. या अनुषंगाने मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलने ५० बेडचे दुसरे युनिट रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद जगताप यांनी दिली.

या हॉस्पिटलमध्ये ५० ऑक्सिजन बेड, ४ फिजिशियन (एम.डी. मेडिसीन), निवासी वैद्यकीय अधिकारी, कुशल नर्सिंग स्टाफ, प्रशासकीय स्टाफ व हाउसकीपिंग स्टाफ अशी सुसज्ज यंत्रणा आहे. बिलाची आकारणी ही शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच करण्यात येते. या हॉस्पिटलमधील सेवा सुविधांची तसेच ऑक्सिजन पुरवठ्याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी भेट दिली. तसेच सर्व पाहणी करून हेल्थपॉईंट हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे कौतुक केले. यावेळी डॉ.चौधरी म्हणाले, सध्याची कोविड-१९ मुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णांची गंभीर परिस्थिती पाहता,असे अद्ययावत उपचार देणारे हॉस्पिटल असणे गरजेचे आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांनी हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या सेवा,उपचार व सुरक्षाविषयक पाहणी केली.

Web Title: 50-bed HealthPoint Multispeciality Hospital in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.