चिकुर्डेत लवकरच ५० बेडचे काेविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:31+5:302021-05-09T04:26:31+5:30
ते म्हणाले चिकुर्डे येथे सुमारे २ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली ...
ते म्हणाले चिकुर्डे येथे सुमारे २ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज अशी इमारत बांधण्यात आली आहे. परंतु अद्याप येथे आरोग्य सेवेचा प्रारंभ सुरू झाला नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने या परिसरात कोरोना रुग्णालयाची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने येथील सुसज्ज अशा प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये सध्या इतर तांत्रिक गोष्टीची पूर्तता अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच ऑक्सिजनचे २५ बेड व इतर २५ बेड असे एकूण ५० बेडचे कोरोना रूग्णालय लवकरच सुरू होणार आहे. या रुग्णालायामुळे चिकुर्डेसह ठाणापुढे, डोंगरवाडी, शेखरवाडी, कार्वे, ऐतवडे बुद्रूक, ढगेवाडी, देवर्डे, करंजवडे, लाडेगाव या गावांची सोय होणार आहे.