श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र विकासासाठी ५० कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:18 AM2021-06-17T04:18:44+5:302021-06-17T04:18:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कर्नाटकातील श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल कर्नाटकचे अल्पसंख्याक व वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महामस्तकाभिषेक कमिटीचे राष्ट्रीय सचिव तथा श्रवणबेळगोळ तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त सुरेश पाटील यांच्या हस्ते हा सत्कार झाला. यावेळी मोहन चौगुले, वसंत पाटील, राजगोंडा पाटील, सुभाष देसाई, योगेश पाटील, श्रीनिवास पाटील, निखिल पाटील उपस्थित होते.
सुरेश पाटील म्हणाले की, कर्नाटक शासनाने तीर्थक्षेत्र विकासासाठी ५० कोटी मंजूर केले आहेत. पहिल्या टप्प्यात २० कोटींची कामे होणार आहेत. यात जिर्णाेद्धार, निवास आरक्षण कार्यालय, नवीन भोजनालय, रस्ते दुरुस्ती, ऑनलाइन बुकिंग यंत्रणा आदींचा समावेश आहे. या कामाची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत येत्या आठ दिवसांत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.