जिल्ह्यात तिमाहीत जीएसटीमध्ये ५० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:14+5:302021-07-08T04:18:14+5:30

सांगली : मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिल्ह्याच्या जीएसटी वसुलीत ५० टक्के वाढ ...

50% increase in GST in the quarter | जिल्ह्यात तिमाहीत जीएसटीमध्ये ५० टक्के वाढ

जिल्ह्यात तिमाहीत जीएसटीमध्ये ५० टक्के वाढ

Next

सांगली : मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिल्ह्याच्या जीएसटी वसुलीत ५० टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे जूनच्या महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत २९ टक्के घट दिसून आली आहे.

जिल्ह्यात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत १९१ कोटींचा महसूल जमा झाला आहे. एप्रिल ते जून २०२० पेक्षा ५० टक्के वाढीमुळे जिल्ह्यातील महसुलास दिलासा कायम आहे. मात्र डिसेंबर २०२० पासून सुरु झालेला जीएसटी वाढीचा जिल्ह्यातील ट्रेंड जून २०२१ मध्ये खंडित झाला आहे. मागील वर्षाच्या जूनमधील महसुलाच्या तुलनेने २९ टक्के घट दिसून येत आहे.

मागीलवर्षी एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत १२७ कोटी २५ लाख जएसटी जमा झाला होता. यावेळी तो १९१ कोटी ५० लाख इतका म्हणजे ६४ कोटींनी घटला आहे. मागीलवर्षी जूनमध्ये अनलॉकमुळे उद्योग, व्यवसाय, सेवा पूर्वत होत होते. त्याचबरोबर एप्रिल व मे २०२० मध्ये कर भरणा करण्यास मुदतवाढ दिली होती आणि प्रलंबित कर जूनमध्ये भरला गेला होता. यावर्षी एप्रिल, मे महिन्यात नियमित कर भरणा झाल्याने जून महिन्याच्या महसुलात मागील वर्षीपेक्षा घट दिसत आहे.

देशाच्या जूनमधील महसुलात मागीलवर्षीच्या तुलनेत २ टक्के जादा कर संकलन झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने विवरणपत्र भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. व्याजात सवलत दिली असून, प्रलंबित विवरणपत्रासाठीही अभय योजना आणली आहे. यामुळे प्रलंबित विवरणपत्रे भरल्यावर आगामी काळातील महसुलात वृद्धी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सांगलीचा विचार करता या कालावधीत जिल्ह्यात कडक लॉकडाऊन होता, मात्र लॉकडाऊनचे निकष पाळून सांगली जिल्ह्यात असलेल्या २५ हजारांहून अधिक उद्योजक, व्यावसायिकांची कामगिरी दिलासादायक ठरली आहे.

Web Title: 50% increase in GST in the quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.