आष्ट्यात संचारबंदीचे पालन न करणाऱ्या ५० वाहनधारकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:27 AM2021-04-16T04:27:38+5:302021-04-16T04:27:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्टा शहरातील विविध मार्गावर संचारबंदीचे पालन न केल्याप्रकरणी ५० वाहनधारकांवर गुरुवारी पोलिसांनी कारवाई केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा शहरातील विविध मार्गावर संचारबंदीचे पालन न केल्याप्रकरणी ५० वाहनधारकांवर गुरुवारी पोलिसांनी कारवाई केली. तसेच काही व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई आष्टा पोलिसांनी केली आहे.
बसस्थानक परिसर, पेठ ते सांगली रस्ता, दूधगाव नाका, रुकडे प्रवेशद्वार यासह विविध चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस निरीक्षक अजित सिद्, पोलीस निरीक्षक उदय देसाई, संदीप बागडी, परशुराम ऐवळे, अभिजित नायकवडी, महेश डांगे यांनी कारवाई केली आहे. दिवसभरात ५० पेक्षा जास्त वाहने ताब्यात घेतली आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आष्टा शहरात कलम १४४ लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. मात्र, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, विनाकारण फिरणाऱ्या लोकांची वाहने ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवरदेखील कारवाई केली आहे.