चांदोली धरण परिसरात ५०० मिलिमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:18 AM2021-06-24T04:18:44+5:302021-06-24T04:18:44+5:30

वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात एक जूनपासून आजपर्यंत ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या ...

500 mm rainfall in Chandoli dam area | चांदोली धरण परिसरात ५०० मिलिमीटर पाऊस

चांदोली धरण परिसरात ५०० मिलिमीटर पाऊस

Next

वारणावती : शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील चांदोली धरण परिसरात एक जूनपासून आजपर्यंत ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या गेल्या तीन दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू आहे. त्यामुळे धरणातील विसर्गही कमी केला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून २०२४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या चोवीस तासांत ७ मिलिमीटर पावसासह एकूण ५०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीसाठा १८.१६ टीएमसी असून, त्यांची टक्केवारी शंभर टक्के ५२.७९ अशी आहे. पाणी पातळी ६०७.८० मीटर झाली आहे. धरणातील विसर्ग १६०० वरून ८१० क्युसेक असा कमी केला आहे. पावसाने उघडीप दिल्याने काही ठिकाणी भात कोळपणीची कामे सुरू आहेत.

Web Title: 500 mm rainfall in Chandoli dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.