जिल्ह्यातील ५०० टन भाजीपाला शेतातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:10+5:302021-05-05T04:42:10+5:30
सांगली : जिल्ह्यातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोरला जाणाऱ्या ९०० टन भाजीपाल्यापैकी सध्या ४०० टनच जात आहे. उर्वरित ...
सांगली : जिल्ह्यातून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोरला जाणाऱ्या ९०० टन भाजीपाल्यापैकी सध्या ४०० टनच जात आहे. उर्वरित ५०० टन भाजीपाला शेतातच पडून आहे. यामुळे उत्पादकांना दररोज ८० लाखांचा फटका बसत आहे.
जिल्ह्यात १२ हजार हेक्टरवर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात आहे. रोज ९०० टन भाजीपाला बाहेरच्या बाजारात पाठविला जातो. स्थानिक बाजारात हजारो टन रोज विक्री होत होती. मात्र सध्या कसाबसा ४०० टन भाजीपाला मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, बेंगलोर येथे जात आहे. तुंग, समडोळी (ता. मिरज) येथून रत्नागिरीला चाळीस टन भाजीपाला जात होता. तोही बंद आहे. दर ७० टक्क्यांनी उतरले आहेत. किलोला ३५ रुपये असणारी ढबू मिरची सहा रुपयांवर आली आहे. कोबी, फ्लॉवर, वांगी, दोडका, दुधी भोपळा, भेंडीला घाऊक बाजारात पाच ते दहा रुपये दर मिळत आहे. भाजी विक्रेते मात्र घरोघरी जाऊन ५० ते ६० रुपये प्रतिकिलोने विकत आहेत, असे उत्पादक मनोज गाजी यांनी सांगितले.
चौकट
भाजीपाल्याचे घाऊक दर
सध्या लॉकडाऊनपूर्वी
ढबू मिरची : ६ रुपये ३५ रुपये
वांगी : ८ ३०
हिरवी मिरची : ५ २५
कोबी : ५ १५
प्लॉवर : ४ २०
दोडका : ८ ३५
दुधी भोपळा : ८ २०