कुपवाडमध्ये ५० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:28 AM2021-05-11T04:28:40+5:302021-05-11T04:28:40+5:30
कुपवाड : लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शिंदे मळा येथील माळी बेकरी व फळ विक्रेत्याकडून महापालिका प्रशासनाने ५० हजारांचा दंड ...
कुपवाड : लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शिंदे मळा येथील माळी बेकरी व फळ विक्रेत्याकडून महापालिका प्रशासनाने ५० हजारांचा दंड वसूल केला.
प्रभाग समिती क्रमांक तीनच्या कार्यक्षेत्रातील शिंदे मळा येथे माळी बेकरी आहे. तेथे नियमांचे उल्लंघन केल्याचे सोमवारी प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी माळी बेकरीवर छापा टाकून मालकाकडून ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला. तेथे एकाने दुकान उघडून फळविक्री सुरू केल्याचेही समोर आले. या फळ विक्रेत्याकडून १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सोमवारी दोन्ही आस्थापनांवर कारवाई करून ५० हजार रुपये इतकी दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांनी दिली. या कारवाईत स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील, अतुल आठवले, विकास कांबळे, गजानन खुळे सहभागी होते.