सांगलीत ५२ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:29 AM2021-09-26T04:29:30+5:302021-09-26T04:29:30+5:30
फिर्यादी मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने झटपट नफा ...
फिर्यादी मुळीक यांचे मित्र दत्ता पाटील यांनी त्यांची विराज कोकणे यांच्याशी ओळख करून दिली होती. त्यावेळी त्याने झटपट नफा मिळविण्यासाठी माझ्याकडे एक स्कीम असल्याचे त्यांना सांगितले. यात १० हजार इतक्या कमी दरान सोने मिळेल असे सांगून गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी ३ तोळ्याची रोख रक्कम कोकणे याच्याकडे दिली. यानंतर दुसऱ्या दिवशी कोकणे याने मुळीक यांना तीन तोळे सोने व पावती दिली. यामुळे खात्री पटल्याने मुळीक यांनी पुन्हा काही रक्कम दिली. त्यावेळी दोन ते तीन दिवसांत सोने आणून देतो म्हणून कोकणे याने सांगितले. मात्र, ते दिलेच नाहीत. त्यानंतर पत्रकारनगर येथील कोकणे याच्या पत्त्यावर गेल्यावर तो व त्याची पत्नी तिथे नव्हती. तसेच त्याची सासरवाडी धनगाव येथेही जाऊन मुळीक यांनी चौकशी केली. मात्र, तेथेेही कोणतीही माहिती मिळाली नाही.