पाच महिन्यांत बेशिस्त वाहनचालकांकडून ५३ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:18 AM2021-06-22T04:18:27+5:302021-06-22T04:18:27+5:30

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध न जुमानता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली ...

53 lakh fine collected from unruly drivers in five months | पाच महिन्यांत बेशिस्त वाहनचालकांकडून ५३ लाखांचा दंड वसूल

पाच महिन्यांत बेशिस्त वाहनचालकांकडून ५३ लाखांचा दंड वसूल

Next

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध न जुमानता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरूच ठेवली आहे. गेल्या पाच महिन्यांत वाहतूक शाखेने २२ हजार १३४ केसेस करुन ५० लाख १० हजार रुपये तर विनामास्क फिरणाऱ्यांच्या १,३६१ केसेस करत तीन लाख २६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना निर्बंध लागू असतानाही पोलिसांकडून अत्यंत काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी सुरू होती. गेल्या दीड वर्षापासून कामाचा ताण असतानाही वाहतूक शाखेने बेशिस्तांवर कारवाईचा बडगा कायम ठेवला आहे. रस्त्यावरील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसह नियमभंग केल्यास तो वाहनधारक पोलिसांच्या रडारवर येत आहे. त्यात वाहतूक शाखेने ‘ई-चलना’व्दारे नियमभंग करणाऱ्यांना दंड करणे सुरु केले आहे.

कोरोना कालावधीत वाहतूक शाखेने शहरातील नाकाबंदीमध्ये वाढ करत दंडाचीही चांगली वसुली केली आहे. दंड न भरता पसार होणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. कोरोना कालावधीत मास्क न घालणाऱ्यांवर सर्वाधिक कारवायांनी वेग घेतला होता. त्यानुसार वाहतूक शाखेने मास्क न घालता फिरणाऱ्या १,३६१ जणांवर केस दाखल केल्या आहेत. याशिवाय कागदपत्रे जवळ न बाळगता फिरणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे. दरम्यान, वाहतूक नियमांचे पालन न केल्यास बेशिस्तांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

नो पार्किंगच्या सर्वाधिक केसेस

सांगली वाहतूक शाखेने या पाच महिन्यांत नो पार्किंगच्या सर्वाधिक केसेस करत दंडाची वसुली केली आहे. शहरातील हरभट रोड, मारुती रोड, कापड पेठ, स्टेशन रोडवर रस्त्यावरच वाहने लावली जातात. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांत ४,५०७ केसेस करत ९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

चौकट

शहरातील प्रमुख चौक टार्गेट

वाहतूक शाखेने शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर अधिक वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. ई-चलन करून दंड वसूल केला जात असल्याने रकमेत वाढ झाली आहे.

कोट

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या सूचनेनुसार शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक नियोजनबद्ध करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक निर्बंध असतानाही अनेक वाहनधारक नियमांचे पालन करत नाहीत. ट्रीपल सीट, मास्क न घालता फिरण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करुन वाहतूक नियमांचे पालन करावे.

- प्रज्ञा देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

चौकट

नियमभंग व केसेसची संख्या

ट्रीपल सीट २७८

विना मास्क १,३६१

नो पार्किंग ४,५०७

मोबाईलवर बोलणे ४५८

विना नंबरप्लेट फिरणे १,६९२

फॅन्सी नंबरप्लेट ६२

कागदपत्रे जवळ न बाळगणे ७,५५८

विना लायसन्स ३७

ट्रीपल सीट

Web Title: 53 lakh fine collected from unruly drivers in five months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.