Sangli: उमदीत उद्योगांसाठी ५३९ हेक्टर जागा आरक्षित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:43 IST2025-03-29T18:43:21+5:302025-03-29T18:43:49+5:30

विठ्ठल ऐनापुरे जत : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी कुंडी येथे नवीन स्वतंत्र एमआयडीसी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी ...

539 hectares of land reserved for promising industries | Sangli: उमदीत उद्योगांसाठी ५३९ हेक्टर जागा आरक्षित 

Sangli: उमदीत उद्योगांसाठी ५३९ हेक्टर जागा आरक्षित 

विठ्ठल ऐनापुरे

जत : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीपूर्वी कुंडी येथे नवीन स्वतंत्र एमआयडीसी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे. त्यादृष्टीने उमदी (ता. जत) येथे ५३९ हेक्टर, तर मोरबगी येथे २४ हेक्टर जागा उपलब्ध केली आहे. सांगली जिल्ह्यात उद्योग विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने याबाबत महत्त्वाची पावले उचलायला सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात औद्योगिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

जत हा दुष्काळी टापू, मागास व दुर्गम भाग असल्याने पहिल्या टप्प्यात त्याला कमी प्रतिसाद मिळाला आहे. तरी विस्तारित म्हैसाळ योजनेचे पाणी, विजयपुरा (विजापूर) गुहागर राष्ट्रीय महामार्गाची जोड आणि विजयपुरा आंतरराष्ट्रीय विमान सेवा या पायाभूत सुविधांमुळे उमदीचा औद्योगिकदृष्ट्या भाग्य खुलणार आहेत.

उमदी (ता. जत) याठिकाणी लोखंड कामाशी निगडित, म्हणजेच कमी पाण्यात होणारा उद्योग यावा, असा प्रयत्न आहे. विशेषतः रेल्वेच्या बोगी बनवण्याचा उद्योग आल्यास त्याचा निश्चित मोठा फायदा होऊ शकतो. मोरबगी येथे २४ हेक्टर क्षेत्र महसूल विभागाच्या ताब्यात आहे. ते महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचाही प्रस्ताव आहे. याबाबतचे निर्णय मंत्रालय पातळीवर होणार आहेत. मात्र, त्याचा निश्चित मोठा फायदा होऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा उद्याेजकांना फायदा होणार

उमदी ते विजयपूर (कर्नाटक) आंतरराष्ट्रीय विमानतळातील अंतर ६४ किलोमीटर इतके आहे. आजघडीला विमान तळाचे काम सुरू झाले आहे. लवकरच ते कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार फक्त दीड तासाचा प्रवास आहे. भविष्यात विमानतळ सुरू झाल्यानंतर कर्नाटक सीमेपर्यंत राज्यमार्ग नियोजित आहे. अंतर एक तासावर येईल, त्याचा उद्योजकांना फायदा होऊ शकतो. उमदी ते सांगली अंतर १३१ किलोमीटर आहे. त्या तुलनेत उमदी औद्योगिक वसाहतीचा विजयपूर जिल्ह्याला अधिक फायदा होऊ शकतो.

Web Title: 539 hectares of land reserved for promising industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.