Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:52 AM2023-06-17T11:52:51+5:302023-06-17T11:53:58+5:30

जादा रेल्वेगाड्यांमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची सोय होणार

54 runs of Miraj Pandharpur Special Train by Central Railway for Ashadhi Ekadashi | Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या

Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या

googlenewsNext

मिरज : आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे मिरज - पंढरपूर - मिरज कुर्डूवाडी व मिरज - नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. विशेष रेल्वेगाड्यांच्या तब्बल ५४ फेऱ्या होणार आहेत.

गाडी क्र. ०११४७ / ४८ पंढरपूर - मिरज विशेष रेल्वेच्या दि. २४, २६, २७ जून व ०१, ०३ जुलै रोजी १० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. ०११०७/०८ मिरज - पंढरपूर रेल्वेच्या दि. २४ जून ते ०३ जुलै २०२३ पर्यंत २० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. ०१२०९/१० मिरज - कुर्डुवाडीदरम्यान विशेष रेल्वेच्या दि. २४ जून ते ०३ जुलैपर्यंत २० फेऱ्या होणार आहेत. गाडी क्र. ०१२०५/०६ नागपूर - मिरज विशेष रेल्वेच्या २५ व २८ जून, २६ व २९ जून रोजी चार फेऱ्या होणार आहेत. 

कोकण व कर्नाटकातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मिरजेतून पंढरपूरला जाण्यासाठी गर्दी होते. जादा रेल्वेगाड्यांमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची सोय होणार आहे. मध्य रेल्वेने आषाढी वारीसाठी विशेष रेल्वेच्या ७६ फेऱ्यांचे नियोजन केले असून, त्यापैकी ५४ फेऱ्या मिरज - पंढरपूरदरम्यान व लातूर - पंढरपूर, खामगाव - पंढरपूर, अमरावती - पंढरपूर, नागपूर - पंढरपूर, भुसावळ - पंढरपूर दरम्यान उर्वरित २२ फेऱ्या होणार आहेत.

Web Title: 54 runs of Miraj Pandharpur Special Train by Central Railway for Ashadhi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.