‘सागरेश्वर’मध्ये ५७२ प्राणी

By Admin | Published: May 25, 2017 11:25 PM2017-05-25T23:25:52+5:302017-05-25T23:25:52+5:30

‘सागरेश्वर’मध्ये ५७२ प्राणी

572 animals in 'Sagareshwar' | ‘सागरेश्वर’मध्ये ५७२ प्राणी

‘सागरेश्वर’मध्ये ५७२ प्राणी

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
देवराष्ट्रे : यशवंतरावजी चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या प्राणीगणनेत मागील काही वर्षांच्या तुलनेत हरणांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या प्राणीगणनेनुसार सांबर व चितळ जातीच्या हरणांसह ५७२ प्राणी आढळून आले आहेत. तर काळवीट जातीची हरणे अभयारण्यात आढळून आली नसल्याचे प्राणीगणनेवरून दिसून येत आहे. अभयारण्याचे वैभव असणारे हरिण जातीचे प्राणीच कमी होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
अभयारण्यातील प्राणीगणनेचा मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास प्राण्यांची संख्या सुरुवातील झपाट्याने वाढल्याचे व नंतर कमी झाल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या प्राणीगणनेमध्ये चितळ - १२३ आणि सांबर -३६२ जातीची हरणे आढळून आली आहेत. याचबरोबर ससे - १४, रानडुक्कर -३४, वानर - ३७, कोल्हा - २ असे प्राणी आढळून आले आहेत. काळवीट, लांडगा, तरस, घोरपड, भेकर जातीचे प्राणी अरण्यातून हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे.
अभयारण्य हरणासाठी प्रसिध्द आहे. सुरुवातीला काळवीट, सांबर, चितळ जातीच्या १२ जोड्या सोडण्यात आल्या. अभयारण्यातील मृगविहार येथे तारेचे कुंपण घालून त्यामध्ये हरणे सोडण्यात आली होती. हळूहळू हरणांच्या संख्येत वाढ होऊ लागली. त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध असतानाही ही हरणे अभयारण्याच्या विस्तारित क्षेत्रात मुक्त करण्यात आली.
हरणांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली आणि अभयारण्यातील चारा कमी पडू लागला, पाण्याची टंचाईही निर्माण झाली आहे.
संख्येत किंंचीत वाढ शक्य
प्राण्यांची गणना करतेवेळी आठ टीम तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रत्येकी ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तीन दिवस पाहणीवरून आकडेवारी काढण्यात आली. यामध्ये किंचीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे वनक्षेत्रपाल सतीश साळी यांनी सांगितले.

Web Title: 572 animals in 'Sagareshwar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.