सांगली जिल्ह्यात रस्ते अपघातात पन्नास दिवसांत ५८ ठार : आलेख वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:01 AM2018-02-27T01:01:32+5:302018-02-27T01:01:32+5:30
सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब व अरुंद रस्ते, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गेल्या काही वर्षांत अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाºयांची
सचिन लाड ।
सांगली : वाहनांची वाढती संख्या, खराब व अरुंद रस्ते, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने गेल्या काही वर्षांत अपघात आणि त्यामध्ये बळी जाणाºयांची संख्या प्रचंड वाढली आहे. २०१८ या नवीन वर्षात अपघातांची मालिकाच सुरूच आहे. १ जानेवारी ते २० फेब्रुवारीअखेर जिल्ह्यात ९४ अपघात होऊन ५८ जणांचा बळी गेला, तर १३९ जण जखमी झाले आहेत.
पुणे-बंगळूर राष्टÑीय महामार्गावरील जिल्ह्यातील कणेगाव ते कासेगाव ही २८ किलोमीटरची हद्द येते. मिरज-पंढरपूर असे दोन राष्टÑीय, तर सांगली ते तासगाव, मिरज-विजापूर, वसगडेमार्गे कºहाड, सांगली ते पेठ, सांगली ते कोल्हापूर असे पाच राज्य महामार्ग आहेत. या प्रत्येक महामार्गावर नेहमी अपघात होतात. मात्र कुठेही पोलीस चौकी नाही. रस्त्यावर वाहतूक प्रचंड वाढली आहे. वाहतूक नियमांचे पालन करण्याकडे प्रत्येकाचे दुर्लक्ष होत असल्याचे वाढत्या अपघातांवरून दिसून येते. जिल्ह्यात दरवर्षी सहाशेहून अधिक अपघात होत आहेत. यामध्ये तीनशे ते सव्वातीनशे लोकांचा बळी जात आहे. कासेगाव-कणेगाव, सांगली-इस्लामपूर, सांगली-तासगाव, विटा-पलूस-कºहाड, अंकली-मिरज, मिरज-पंढरपूर या मार्गांवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. खराब रस्त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण दोन टक्के आहे.
'जिल्ह्यातील ३९ ठिकाणे : धोकादायक
जिल्ह्यात वर्षानुवर्षे होणाºया अपघातांची कारणे शोधून काढण्यासाठी त्यावर उपाययोजना राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन व पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी घेतला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, एसटी महामंडळ व सार्वजनिक रस्ते बांधकाम विभागातील अधिकाºयांनी संयुक्त समिती स्थापन करून अपघातस्थळांचा सर्व्हे केला. यामध्ये पाचपेक्षा जास्त बळी व जखमी झाले आहेत, याचा शोध घेण्यात आला. जिल्ह्यात अशी ३९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. नागज फाटा, येलूर फाटा, इटकरेफाटा, वाघवाडी फाटा, लक्ष्मी फाटा, पेठ नाका, आष्टा नाका, महाराजा हॉटेल, कुची, तासगाव फाटा, शिरढोण- कुची- कवठेमहांकाळ फाटा, कामेरी, तांदूळवाडी, येडेनिपाणी फाटा, सिद्धेश्वर मंदिर, कवलापूर, केरेवाडी, शेळकेवाडी व भोसे आदी ठिकाणांचा समावेश आहे.
पोलिसांची संख्या अपुरी
जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. ७०५ गावे आणि २५ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. आज प्रत्येक घरात दुचाकी आहे. वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची लांबी, रुंदी मात्र अपवाद वगळता तेवढीच राहिली आहे. सांगली, मिरज, कुपवाड ही तीन प्रमुख शहरे वगळली, तर दहा तालुक्यांच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याचे दिसून येते.
कारणांचा शोध
समितीने अपघाताच्या ठिकाणांची पाहणी करून कारणे कोणती, तेथील त्रुटी, तसेच उपाययोजनांचा अभ्यास केला. यातून त्यांना रस्त्यावर दुभाजक नाहीत, अपघाताचा इशारा देणारे फलक नाहीत, रस्ता कुठे संपतो ते दर्शविणारे फलक नाहीत. धोकादायक वळणे या बाबी प्रकर्षाने जाणविल्या आहेत.