राजारामबापूकडून ६ कोटींचे व्याज सभासदांच्या खात्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:31+5:302021-01-17T04:23:31+5:30
इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या असणाऱ्या ठेवीवरील २१ महिन्यांचे व्याज सभासद- ...
इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासदांच्या असणाऱ्या ठेवीवरील २१ महिन्यांचे व्याज सभासद- बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी दिली. ही रक्कम रुपये ६ कोटी २० लाख इतकी आहे.
ते म्हणाले, ऊस उत्पादक सभासद-बिगर सभासदांच्या राजारामबापू साखर कारखान्याकडे सहवीजनिर्मिती प्रकल्पासह काही ठेवी आहेत. या ठेवीवरील व्याज एप्रिल महिन्यात त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करीत असतो. मात्र एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद झाल्याने हे व्याज वर्ग करता आले नाही. त्यामुळे सन २०१९-२० मधील १२ महिन्यांचे, व २०२०-२१ मधील ३१ डिसेंबर २०२० अखेरच्या ९ महिन्यांचे व्याज बिल बँक खात्यावर वर्ग केले आहे. पहिल्या वर्षाच्या १२ महिन्याचे रु.३ कोटी ५४ लाख ११ हजार,तर दुसऱ्या वर्षातील ९ महिन्यांचे २ कोटी ६६ लाख २९ हजार अशी ही रक्कम आहे. यानंतर प्रत्येक वर्षाच्या जानेवारी महिन्यात व्याज बिल बँक खात्यावर वर्ग केले जाणार आहे,याची ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक विराज शिंदे, श्रेणिक कबाडे, एल. बी. माळी, दिलीपराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, मुख्य लेखापाल अमोल पाटील उपस्थित होते.