‘राजारामबापू’कडून ६० लाख सुपूर्द

By admin | Published: March 29, 2016 11:25 PM2016-03-29T23:25:07+5:302016-03-30T00:05:38+5:30

म्हैसाळ योजनेची पाणीपट्टी : जत युनिटकडून हातभार

60 lakh handover to Rajaram Bapu | ‘राजारामबापू’कडून ६० लाख सुपूर्द

‘राजारामबापू’कडून ६० लाख सुपूर्द

Next

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या तिप्पेहळ्ळी-जत युनिटकडे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील ७६ गावातून २०१५-१६ मध्ये गळितास आलेल्या १ लाख २१ हजार टन उसाच्या बिलातून वसूल पाणीपट्टीची रक्कम ६० लाखांचा धनादेश कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला़ याप्रसंगी योजनेच्या व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता एस़ एम़ नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पी़ आऱ पाटील म्हणाले, ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या व्यवस्थापन विभागाने आमच्या कारखान्यास दि़ २१ मार्च १६ रोजी या योजनेच्या लाभक्षेत्रातून तिप्पेहळ्ळी-जत युनिटकडे गळितास आलेल्या उसाच्या बिलातून शासकीय पाणीपट्टीची वसुली करण्याबाबत कळविले होते़
आमच्या तिप्पेहळ्ळी-जत युनिटकडे जत, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव तालुक्यातील ७६ गावांतून गळितास आलेल्या ऊस बिलातून प्रतिटन ५० रुपयांची कपात केली आहे़ माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी अर्थमंत्री असताना येथील उपसा सिंचन कामांना निधी देण्याचा प्रयत्न केला आहे़
याप्रसंगी शेती समितीचे अध्यक्ष श्रेणिक कबाडे, डी़ एम़ पाटील, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक सर्जेराव देशमुख उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: 60 lakh handover to Rajaram Bapu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.