जिल्ह्यात कोरोनाचे ६० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:28 AM2021-05-19T04:28:42+5:302021-05-19T04:28:42+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण सलग दुसऱ्या दिवशी अधिक आहे. पण मृत्यूचा दर मात्र जैसे थेच असून ...

60 victims of corona in the district | जिल्ह्यात कोरोनाचे ६० बळी

जिल्ह्यात कोरोनाचे ६० बळी

Next

सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण सलग दुसऱ्या दिवशी अधिक आहे. पण मृत्यूचा दर मात्र जैसे थेच असून दिवसभरात जिल्ह्यातील ४६ व परजिल्ह्यातील १४ अशा ६० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १२५८ नवे रुग्ण आढळून आले, तर २०२७ जण कोरोनामुक्त झाले. उपचाराखालील २३९६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. मंगळवारी वाळवा तालुक्यात सर्वाधिक २५७ रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात ४५, जत १५७, कडेगाव ९४, कवठेमहांकाळ ५३, खानापूर ६३, मिरज १२०, पलूस ९४, शिराळा १२९, तासगाव १०६, तर महापालिका क्षेत्रात सांगलीत ५६, मिरजेत ५४ असे १४० रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, पुणे, जालना, कर्नाटकातील ९४ रुग्णही उपचारासाठी दाखल झाले आहेत.

दिवसभरात जिल्ह्यातील ४६ जणांचा मृत्यू झाला. त्यात कडेगाव १, पलूस २, मिरज तालुका ५, जत ४, खानापूर ६, तासगाव १०, वाळवा ९, कवठेमहांकाळ २, शिराळा तालुक्यातील ३ तर महापालिका क्षेत्रात सांगलीतील दोन, मिरजेतील एक व कुपवाडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील कर्नाटक ६, कोल्हापूर ४, सातारा २, सोलापूर २ अशा १४ जणांचाही कोरोनाने बळी घेतला.

सध्या २३९६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर जिल्ह्यातील २०२९ व जिल्ह्याबाहेरील ८५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. एकूण आरटीपीसीआरच्या १७२५ चाचण्यात ४३८ पाॅझिटिव्ह तर अँटिजनच्या ४०५३ चाचण्यात ९१४ रुग्ण सापडले.

चौकट

आतापर्यंतचे बाधित : १,०२,९०६

कोरोनामुक्त झालेले : ८५,५५३

आतापर्यंतचे मृत्यू : ३०१६

चौकट

मंगळवारी दिवसभरात...

सांगली : ५६

मिरज : ५४

आटपाडी : ४५

जत : १५७

कडेगाव : ९४

कवठेमहांकाळ :५३

खानापूर : ६३

मिरज : १२०

पलूस : ९४

शिराळा : १२९

तासगाव : १०६

वाळवा : २५७

Web Title: 60 victims of corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.