सांगलीत ६00 बेशिस्त वाहनधारकांना ह्यई-चलनह्णचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 12:58 PM2017-10-09T12:58:56+5:302017-10-09T13:02:48+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहर परिसरातील सातशे बेशिस्त वाहनधारकांना ई-चलनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा घरी पाठविण्यात आल्या आहेत. ई-चलन प्रणालीमुळे वादावादीला पूर्णविराम मिळाला आहे. वाहतूक नियम तोडूनही दंड भरण्यास नकार देणाºयांना ही नोटीस भारी पडत आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची नोटीस थेट घरी मिळत असल्याने वाहनधारक दंड भरण्यास स्वत: वाहतूक शाखेत हजेरी लावत आहेत.
सचिन लाड
सांगली : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया शहर परिसरातील सातशे बेशिस्त वाहनधारकांना ई-चलनच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईच्या नोटिसा घरी पाठविण्यात आल्या आहेत. ई-चलन प्रणालीमुळे वादावादीला पूर्णविराम मिळाला आहे. वाहतूक नियम तोडूनही दंड भरण्यास नकार देणाºयांना ही नोटीस भारी पडत आहे. दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल करण्याची नोटीस थेट
घरी मिळत असल्याने वाहनधारक दंड भरण्यास स्वत: वाहतूक शाखेत हजेरी लावत आहेत.
ट्रिपल सीट जाणे, सिग्नल तोडणे, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, दारूच्या नशेत वाहन चालविणे, सीटबेल्ट न घालणे, नियमबाह्य नंबर प्लेट, कर्कश हॉर्न, सिग्नल तोडणे, नो-पार्किंगमध्ये वाहन लावणे, लायसन्स नसणे,हेल्मेट न घालणे यासह इतर वाहतूक नियम वाहनधारकांकडून मोडले जातात. वाहतूक पोलिसांनी अडविल्यानंतर दंड भरण्यास टाळाटाळ केली जाते. आपण नियम तोडलाच नाही, असे ठणकावून सांगतात. अनेक राजकीय नेत्यांचे वजन वापरुन पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो. याला आळा घालण्यासाठी महिन्यापूर्वी जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी वाहतूक शाखेत ई-चलन प्रणाली सुरूकेली आहे. या माध्यमातून वाहतूक नियम तोडणाºया वाहनधारकांचे फोटो वाहतूक पोलिस मोबाईलवर घेत आहेत.
फोटो घेतल्यानंतर वाहनाच्या क्रमांकावरून मालकाचे नाव व पत्ता समजतो. तसे सॉफ्टवेअर प्रत्येक पोलिसाच्या मोबाईलवर घेण्यात आले आहे. वाहनधारकाचे नाव, पत्ता समजल्यानंतर त्याला घरी नोटीस पाठवून सात दिवसांत वाहतूक शाखेत दंड भरावा, अन्यथा खटला दाखल केला जाईल, असा इशारा दिला जातो.
मोबाईलवर घेतलेल्या फोटोत संबंधित वाहनधारकाचे वाहन, त्याने कोणत्या प्रकारचा नियम तोडला आहे, याचे चित्रण, वेळ, ठिकाण येत आहे. या सर्व बाबींचा उल्लेख नोटिशीत असतो. त्यामुळे वाहनधारकांना खोटे बोलण्याची संधी मिळत नाही. ह्यई-चलनह्ण असे या कार्यप्रणालीस नाव देऊन गेल्या महिन्यापासून कारवाई सुरू ठेवली आहे. दंड किती वसूल झाला, यापेक्षा आपण चुकलो असतानाही
पोलिसांशी वाद घातला, हे घरी नोटीस आल्यानंतर वाहनधारकांना समजत आहे.
सीसीटीव्ही, सिग्नल बसणार!
शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व बदल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राजवाडा चौक, पुष्पराज चौक, आझाद चौक, सिव्हिल चौक येथे सिग्नल बसविण्यात आले आहेत. कॉलेज कॉर्नर, आमराई आदी गर्दीच्या चौकात सिग्नल बसविण्याचे नियोजन सुरु आहे. ह्यई-चलनह्ण प्रणालीची प्रभावीपणे अंमलबजावणी व गुन्ह्यांची उकल, तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून पोलिसांना निधी मिळणार आहे.
दंड किती वसूल झाला, यापेक्षाही वाहनधारकांना वाहतूक नियम व शिस्त लागली पाहिजे. दंडात्मक कारवाईचा बडगा उगारताना अनेकदा वादाचे प्रकार आजही घडतात. ई-चलनमुळे मी चूक केली नाही, मग दंड का भरू, असे वाहनधारकांना आता
म्हणता येत नाही. दंड जरी भरण्यास नकार दिला तरी, त्याच्याकडून ई-चलनच्या माध्यमातून वसूल करता येत नाही. या प्रणालीचा आणखी प्रभावीपणे वापर केला जाईल.
- अतुल निकम,
सहाय्यक पोलिस निरीक्षक,
वाहतूक नियंत्रण शाखा, सांगली.