हेल्मेट, सीटबेल्टविना राज्यात ६ हजार ११८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:57+5:302021-09-27T04:27:57+5:30

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यात २०२० मध्ये हेल्मेट व सीटबेल्ट नसल्याने ठार झालेल्यांची संख्या तब्बल ६ ...

6,118 deaths in the state without helmets and seatbelts | हेल्मेट, सीटबेल्टविना राज्यात ६ हजार ११८ मृत्यू

हेल्मेट, सीटबेल्टविना राज्यात ६ हजार ११८ मृत्यू

Next

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : राज्यात २०२० मध्ये हेल्मेट व सीटबेल्ट नसल्याने ठार झालेल्यांची संख्या तब्बल ६ हजार ११८ इतकी आहे. एकूण अपघाती मृत्यूत हे प्रमाण ५२ टक्के इतके आहे. वाहनधारकांचा हेल्मेट व सीटबेल्टबाबत गाफिलपणा व पोलीस कारवाईची उदासीनता यामुळे या घटना वाढत आहेत.

राज्यात घडणाऱ्या एकूण अपघातात ४८ टक्के अपघात हे दुचाकींचे होत असल्याची बाब समोर आली आहे. मृत्यूमध्येही दुचाकीस्वारांचीच संख्या सर्वाधिक आहे. विना हेल्मेट सुसाट वेगाने वाहन चालविल्यामुळे दुचाकींचे अपघात वाढत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र महामार्ग पोलिसांनी नोंदविले आहे. राज्यातील सर्वाधिक अपघात हे शहरांतर्गत किंवा ग्रामीण रस्त्यांवर होत आहेत व याच मार्गांवर हेल्मेट व सीटबेल्टची कारवाई केली जात नाही. त्यामुळेच गेल्या चार वर्षांत अशा प्रकारच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये सर्वप्रकारच्या अपघातांचे प्रमाण घटले असले तरी ते अद्याप चिंताजनक आहे.

चाैकट

सुरक्षासाधनांविना अपघाताचे तुलनात्मक आकडे

हेल्मटविना

वर्ष ठार गंभीर जखमी

२०१८ ५२५२ ६४२६

२०१९ ५३२८ ६४२७

२०२० ४८७८ ४८२७

सीटबेल्टविना

वर्ष ठार गंभीर जखमी

२०१८ १६५६ २९२१

२०१९ १६९७ २७२०

२०२० १२४० १७०७

अपघातात हेल्मेट नसल्याचा परिणाम

४३% ठार

४२% गंभीर जखमी

१५% किरकोळ जखमी

चौकट

हा काळ सर्वांत धोकादायक

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहिले तर दुपारी ३ ते ६ व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत सर्वाधिक अपघात झाले आहेत. म्हणजेच या सहा तासांतच ३५ टक्के अपघात घडत आहेत. २०२० मध्येही असेच चित्र आहे.

चौकट

कोणत्या मार्गावर किती अपघात

मार्ग अपघात मृत्यू

एक्स्प्रेस वे १६१ ६६

राष्ट्रीय महामार्ग ६३४० ३४६२

राज्य महामार्ग ५५१८ २९७१

जिल्हा व अन्य १२९५२ ५०७०

चाैकट

हिट ॲण्ड रनचे ३ हजारांवर बळी

हिट ॲण्ड रनचे प्रमाण राज्यात अधिक आहे. २०२० मध्ये असे एकूण ६ हजार ४९ अपघात घडले. यात ३ हजार १६० लोकांचा जीव गेला. अतिवेगाने वाहन चालवून राज्यात वर्षभरात १९४१९ घटना घडल्या. यात ९ हजार १५२ लोकांचा बळी गेला आहे.

Web Title: 6,118 deaths in the state without helmets and seatbelts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.