Sangli Election सांगली महापालिकेसाठी ६२ टक्के मतदान : किरकोळ वादावादीचे प्रकार-५४१ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद; उद्या मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:13 AM2018-08-02T00:13:59+5:302018-08-02T17:40:57+5:30

राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीसाठी वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता अत्यंत चुरशीने सरासरी ६२ टक्के मतदान झाले. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५४१ उमेदवारांचे भवितव्य

62 percent voting for Sangli municipal corporation: type of minor dispute - fate of 541 candidates' EVMs closed; Tomorrow counting | Sangli Election सांगली महापालिकेसाठी ६२ टक्के मतदान : किरकोळ वादावादीचे प्रकार-५४१ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद; उद्या मतमोजणी

Sangli Election सांगली महापालिकेसाठी ६२ टक्के मतदान : किरकोळ वादावादीचे प्रकार-५४१ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद; उद्या मतमोजणी

Next

सांगली : राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या बुधवारी झालेल्या निवडणुकीसाठी वादावादीचे किरकोळ प्रकार वगळता अत्यंत चुरशीने सरासरी ६२ टक्के मतदान झाले. २० प्रभागांतील ७८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत ५४१ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. शुक्रवारी सांगली-मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामात मतमोजणी होणार आहे. २०१३ च्या महापालिका निवडणुकीत ६३.४८ टक्के मतदान झाले होते.

महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नेतृत्वाचा कस लागणार असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली होती. पदयात्रा, रॅलीच्या माध्यमातून गल्ली-बोळ पिंजून काढण्यात आले. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते, तर भाजप, शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारलेल्या ३५ हून अधिक उमेदवारांनी एकत्र येत अपक्ष विकास महाआघाडीची स्थापना केली होती. या निवडणुकीत काँग्रेस ४५, तर राष्टÑवादी ३४ जागांवर लढत आहे. त्यातील पाच जागांवर मैत्रीपूर्ण लढतहोत आहे, तर या आघाडीने चार जागा अपक्षांसाठी सोडल्या आहेत. भाजपने पहिल्यांदाच सर्वच्या सर्व ७८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना ५१ जागा लढवत असून, सात उमेदवारांना त्यांनी पुरस्कृत केले आहे. याशिवाय शहर सुधार समितीचे १५, एमआयएमचे ८, स्वाभिमानी विकास आघाडीचे ९ उमेदवार आणि लोकशाही आघाडी, अपक्ष महाआघाडीही रिंगणात आहे. भाजप-शिवसेनेच्या मंत्र्यांसह सर्वच पक्षांचे राज्यस्तरावरील नेते प्रचारात सहभागी झाले होते.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नेतृत्व आ. जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, आ. सतेज पाटील, हर्षवर्धन पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी, तर भाजपची धुरा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांनी सांभाळली. शिवसेनेची सूत्रे खा. गजानन कीर्तीकर, नितीन बानुगडे-पाटील, संजय विभुते, नगरसेवक शेखर माने यांच्याकडे, तर जिल्हा सुधार समितीची सूत्रे अ‍ॅड. अमित शिंदे यांच्याकडे होती. स्वाभिमानीचे नेतृत्व नगरसेवक गौतम पवार, पृथ्वीराज पवार या बंधूंनी केले.

निवडणुकीतील चुरस मतदानाला सुरुवात होताच दिसून आली. सकाळी साडेसातला मतदानाला सुरुवात झाली आणि अर्ध्या-पाऊण तासातच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या. २० प्रभागांतील ५४४ मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावून मतदान केले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांचाही उत्साह मोठा होता. विस्तारित भागातील श्रमिक, कष्टकरी वर्ग दुपारनंतर मतदानासाठी केंद्रावर पोहोचला. साडेअकरा ते दीडपर्यंत मतदानाची टक्केवारी ३४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतरच्या दोन तासात मात्र मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र दिसत होते. साडेतीन वाजेपर्यंत ४८ टक्के, तर सायंकाळी साडेपाचपर्यंत ६२ टक्के मतदान झाले. वेळ संपल्यानंतरही दोन मतदान केंद्रांवर सायंकाळी सव्वासातपर्यंत मतदान सुरू होते.

सहा मतदान केंद्रांची जबाबदारी महिलांवर
या निवडणुकीत प्रथमच सहा मतदान केंद्रांची जबाबदारी पूर्णपणे महिलांवर सोपविण्यात आली होती. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकाऱ्यापासून ते पोलीस शिपायांपर्यंत महिला कर्मचारी व अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरला. यंदा निवडणुकीतही महिलांचा लक्षणीय सहभाग प्रथमच पाहायला मिळाला. केंद्राबाहेरील बुथवर महिला कार्यकर्त्यांचा सहभाग मोठा होता. त्या मतदारांना बुथवर मदत करताना दिसत होत्या.


केंद्रांवर सनईचे सूर
मतदान केंद्रांवर मतदारांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. अनेक केंद्रांवर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या; तर नारळाच्या झावळ्या लावून विद्युत रोषणाईही करण्यात आली होती. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सकाळी हिंदू-मुस्लिम चौकातील मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदारांचे स्वागत केले. अनेक केंद्रांतील मतदारांवर फुलांचा वर्षावही केला जात होता.


नेत्यांची धावपळ  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आ. विश्वजित कदम, जयश्रीताई पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, नीता केळकर, शिवसेनेचे संजय विभुते, आनंदराव पवार, शेखर माने यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

'‘ईव्हीएम’मध्ये बिघाडामुळे तणाव
गणेशनगर परिसरात ईव्हीएमवर एकाच पक्षाच्या चारही उमेदवारांच्या नावासमोर शाई लावल्याचा प्रकार उघडकीस येताच तणाव झाला. कॉँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने पोलिसांनी लाठीमार केला.
निवडणूक अधिकाºयांनी उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा संशय दूर केला. प्रभाग १० मधील नवीन वसाहत व केसीसी शाळेतील ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे तासभर मतदान खोळंबले होते.
 

तीनच उमेदवारांना मतदान करून गायब
मिरज : मिरजेत प्रभाग क्रमांक चारमध्ये एका मतदान केंद्रात तीनच उमेदवारांना मतदान करून मतदार गायब झाला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने यंत्र मध्येच थांबल्याने मतदारास शोधून आणून मतदान करण्यास भाग पाडण्यात आले. अर्धवट मतदानामुळे निवडणूक कर्मचाºयांची धावपळ उडाली. -

Web Title: 62 percent voting for Sangli municipal corporation: type of minor dispute - fate of 541 candidates' EVMs closed; Tomorrow counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.