सांगली जिल्ह्यातील ६२ हजार शेतकरी कर्जमाफीस अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:34 PM2019-02-15T23:34:24+5:302019-02-15T23:36:07+5:30
सांगली : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत अंतिम टप्प्यात माहितीतील त्रुटींमुळे अडलेल्या ९0 हजार शेतकऱ्यांच्या अर्जांच्या छाननीत केवळ २८ हजार ...
सांगली : राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत अंतिम टप्प्यात माहितीतील त्रुटींमुळे अडलेल्या ९0 हजार शेतकऱ्यांच्या अर्जांच्या छाननीत केवळ २८ हजार शेतकरीच पात्र ठरले आहेत. त्यांची यादी राज्य शासनाकडे पाठविली असून, अपात्र ठरलेल्या ६२ हजार शेतकºयांच्या पदरी निराशा आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९0 हजार शेतकºयांच्या त्रुटीयुक्त अर्जांची पडताळणी झाली. निकषांमध्ये न बसणाºया एकूण ६२ हजार शेतकºयांना अपात्र ठरविले आहेत. पात्र व अपात्र ठरलेली खाती जिल्हा मध्यवर्ती बँकसह राष्ट्रीयीकृत बँकांचीही आहेत. पात्र शेतकºयांनाच कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीयीकृत बँकातील १ हजार ५८६ शेतकºयांच्या यादीची पडताळणी अजून सुरु आहे.
जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार शेतकरी कुटुंबांनी कर्जमाफीसाठी अर्ज आॅनलाईन भरले होते. चार याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये ९१ हजार १८९ शेतकºयांना १८७ कोटी ३५ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली. याशिवाय २६ हजार शेतकरी ओटीएससाठी पात्र ठरले आहेत. कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी अद्याप सुमारे एक लाख शेतकरी प्रलंबित आहेत. शेतकºयांनी अर्जात भरलेली माहिती आणि बँकेची माहिती यांचा मेळ लागत नसल्याने तीन याद्या शासनाने जिल्हा बँकेकडे पुन्हा पाठविली होत्या. दहा तालुक्यातील ७७ हजार ३५७ शेतकºयांचा समावेश आहे.
राष्ट्रीयीकृत बँकामधील १६ हजार शेतकºयांचा समावेश आहे. मृत शेतकºयांच्या वारसदारांची नावे अर्जदार म्हणून येणे, आधार व तत्सम माहिती अपूर्ण असणे, कर्ज खाते क्रमांक व कर्ज रक्कम, थकबाकीची माहिती जुळत नसल्याचे स्पष्ट झाले होते.