जिल्ह्यात कोरोनाचे ६४ नवे रुग्ण; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:49+5:302021-03-18T04:26:49+5:30
सांगली : सलग दोन दिवसांपासून वाढतच चाललेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी काहीशी घट झाली. दिवसभरात ६४ नवे रुग्ण आढळून येतानाच ...
सांगली : सलग दोन दिवसांपासून वाढतच चाललेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत बुधवारी काहीशी घट झाली. दिवसभरात ६४ नवे रुग्ण आढळून येतानाच सांगलीतील एकाचा मृत्यू झाला आहे. तर २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आठवड्यापासून बाधितांच्या संख्येतील वाढ कायम होती. दोन दिवसात तर ८० पेक्षा जादा रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी यात थोडीशी घट झाली आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ३३ रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत १०४४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ४४ जण बाधित आढळले आहेत तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ६४२ तपासणीतून २६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रशासनाने चाचण्याचे प्रमाण वाढविले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत सध्या ४६५ जण उपचार घेत असून त्यातील ५१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४ जण ऑक्सिजनवर तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, पुणे, बेळगाव व बिहार येथील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४९,१५५
उपचार घेत असलेले ४६५
कोरोनामुक्त झाले ४६,९२०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १,७७०
बुधवारी दिवसभरात
सांगली २३
मिरज १०
वाळवा ७
मिरज तालुका ६
आटपाडी ४
कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ प्रत्येकी ३
पलूस २
शिराळा, जत, तासगाव प्रत्येकी १