जिल्ह्यातील ६५ हजार कुटुंबांना मिळणार मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:38+5:302021-04-16T04:26:38+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद राहणार असल्याने ...
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने १४ एप्रिलपासून संचारबंदी आदेश लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापना बंद राहणार असल्याने गरजूंची अडचण होणार आहे. यामुळे राज्य शासनाने प्रथमच दारिद्र्यरेषेखालील सर्व लाभार्थ्यांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मिळणार आहे.
पुढील पंधरा दिवस सर्वत्र कडक निर्बंध असल्याने मिळणारे पाच किलो धान्य लाभार्थ्यांना फायदेशीर ठरणार आहेत. जिल्हा प्रशासनाला योजनेच्या अंमलबजावणीबाबत अद्याप कोणत्याही सूचना नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी सांगितले.
चौकट -
लाभार्थ्यांना मिळणार गहू, तांदूळ
राज्य शासनाने दारिद्र्यरेषेखालील लोकांना दिलासा दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सुरू असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अभियानात आता दुर्बल घटकांना दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतूनही लाभार्थ्यांना मोफत धान्य मिळाले होते. आता राज्य शासनाने दिलासा देत निर्बंध लागू योजनाही लागू केल्याने जिल्ह्यातील ६५ हजार कुटुंबांची सोय झाली आहे.
कोट-
काेरोनामुळे अगोदरच हातचे काम गेले आहे. घरात बसून रोजच्या चूल पेटविण्याची चिंता असते. मोफत धान्य मिळणार असल्याने त्याचा फायदा होणार आहे.
भागिरथी शिंदे
कोट-
पुढील पंधरा दिवस काम बंद आहे. त्यामुळे अगोदरच चिंता होती. शेतातील कामेही आता कमी झाली आहेत. त्यामुळे या योजनाचा आम्हाला फायदा होईल.
सीताराम खोत
कोट
गेल्या वर्षापासून अडचणी सुरूच आहेत. त्यात अजूनही काम सुरू नाहीत. आता पुन्हा लॉकडाऊन झाल्यास आम्हाला मदत कोण करणार? आताची धान्याची मदत होत असली तरी ती सुरूच ठेवावी.
राजाराम जाधव
चौकट
तालुकानिहाय लाभार्थी कुटुंबांची संख्या
सांगली १३३८३
मिरज ११२७४
जत ४१०८
कवठेमहांकाळ १४७६
आटपाडी ८३३४
तासगाव २२५४
खानापूर ५०७९
कडेगाव ३१३४
पलूस ३६२
वाळवा ६८१९
शिराळा ८७०५
एकूण ६४९२८