सांगलीच्या अर्थकारणाला वेग येणार; ६५५ उद्योग सुरु, मात्र १४४ कलम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:27 AM2020-05-05T10:27:45+5:302020-05-05T10:33:16+5:30

यासह परवानगी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज असे एकूण 655 उद्योग व त्यांनी मागणी केलेल्या 189 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

655 industrial units started in Sangli district | सांगलीच्या अर्थकारणाला वेग येणार; ६५५ उद्योग सुरु, मात्र १४४ कलम कायम

सांगलीच्या अर्थकारणाला वेग येणार; ६५५ उद्योग सुरु, मात्र १४४ कलम कायम

Next
ठळक मुद्दे- जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरीसायं. 7 ते सकाळी 7 या कालावधीत अत्यावश्यक नसलेल्या कारणांनासाठी सर्व व्यक्तींच्या संचारास मनाई

सांगली : सांगली जिल्ह्यात 03 मे अखेर अत्यावश्यक असणाऱ्या 416 उद्योगांना व यातील 6637 कर्मचाऱ्यांची ऑफलाईन परवानगी देण्यात आली आहे. यात एमआयडीसी मधील 184 युनिट व 1945 कर्मचारी तर या व्यतिरिक्त 232 युनिट व 4692 कर्मचारी यांचा समावेश आहे. यासह परवानगी पोर्टलवर प्राप्त झालेले अर्ज असे एकूण 655 उद्योग व त्यांनी मागणी केलेल्या 189 वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती मा.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

यामध्ये अत्यावश्यक उद्योग घटकांमध्ये अन्न पदार्थाचे उत्पादन करणारे उद्योग डेअरीसह 202 युनिट व त्यामधील 4871 कर्मचारी, पशु/पोल्ट्रीखाद्य उद्योग 39 व त्यामधील 375 कर्मचारी, कोल्ड स्टोअरेज/वेअर हाउस 71 युनिट व त्यामधील 550 कर्मचारी,कॉरोगेटेड बॉक्स उत्पादन करणारे 34 युनिअ व त्यामधील 310 कर्मचारी, औषधे व वैद्यकीय साधने उत्पादन करणारे 35 युनिट व त्यामधील 284 कर्मचारी, इतर- पॅकिंगशी सबंधित उद्योग 35 व त्यमधील 274 कर्मचारी, असे एकूण 416 युनिट व त्यामधील 6637 कर्मचारी यांना आत्तापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.


सांगली जिल्ह्यात कलम 144 लागू

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य शासनाने 17 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या अनुष्ंगाने सांगली जिल्ह्यात 4 मे ते 17 मे 2020 रोजी 24.00 पर्यत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 अन्वये
सायंकाळी 7 वाजले नासून सकाळी 7 वाजेपर्यत अत्यावश्यक नसलेल्या कारणांसाठी सर्व व्यक्तींच्यासंचारास जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मनाई केली आहे. सदरचा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असणाऱ्या व अन्य अत्यावश्यक सेवा सुविधा व वस्तू यांच्या पुरवठ्याशी सबंधित व्यक्ती व वाहने आणि कोणत्यही स्वरूपाच्या निकडीच्या प्रसंगासव शासकीय कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.

 

Web Title: 655 industrial units started in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.