जिल्ह्यात ६६३३२ टन खत, ३३११० क्विंटल बियाणे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:19 AM2021-06-06T04:19:35+5:302021-06-06T04:19:35+5:30

सांगली : जिल्ह्यात तीन लाख ८६ हजार १२० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज आहे. एक लाख ४२ ...

66332 tons of fertilizer, 33110 quintals of seeds available in the district | जिल्ह्यात ६६३३२ टन खत, ३३११० क्विंटल बियाणे उपलब्ध

जिल्ह्यात ६६३३२ टन खत, ३३११० क्विंटल बियाणे उपलब्ध

Next

सांगली : जिल्ह्यात तीन लाख ८६ हजार १२० हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज आहे. एक लाख ४२ हजार १६० टन रासायनिक खतांची मागणी केली होती. त्यापैकी ६६ हजार ३३२ टन खते आली आहेत. विविध पिकांची ३३ हजार ११० क्विंटल बियाणे मागणीपैकी ५३२१ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. शिराळा, वाळवा, मिरज पश्चिम, पलूस तालुक्यात सोयाबीन पेरणी सुरू झाली आहे.

यंदाचा मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये लगबग आहे. कृषी विभागाने ३३ हजार क्विंटलची बियाणांची मागणी केली होती. आतापर्यंत पाच हजार ३२१ क्विंटल बियाणे आली आहेत. त्यामध्ये भात ८७७ क्विंटल, ज्वारी २३४ क्विंटल, बाजरी २०७ क्विंटल, सोयाबीन ३२२४ क्विंटल, उडीद ३५३ क्विंटल, मका ३५३ क्विंटलचा समावेश आहे.

खतांची १ लाख ४२ टनांची मागणी केली होती. सध्या जिल्ह्यात डीएपी, युरिया, एमओपी, एनपीके, एसएसपी, कंपोस्ट आदी ६६ हजार ३३२ टन रासायनिक खते आली आहेत. मान्सूनला आठवडाभराचा अवधी असला तरी कृषी विभाग आणि शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी केली आहे.

शिराळा तालुक्यात धूळवाफेवर भाताची पेरणी झाली आहे. आठवडाभरात पाऊस चांगला सुरू झाल्यामुळे शिराळा, वाळवा, पलूस, मिरज पश्चिम, तासगाव तालुक्यात सोयाबीन टोकणीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

चौकट

खते, बियाणांची बोगसगिरी रोखण्यासाठी भरारी पथके

जिल्ह्यात खते व बियाणांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून अकरा भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. खते, बियाणांसाठी जादा रक्कम घेणे, खराब बियाणे आदींबाबत कृषी विभागाकडे तक्रार केल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. बियाणे विक्रेते २४४७, खत विक्रेते ३१७५, कीटकनाशके विक्रेते २७०७ यांची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

Web Title: 66332 tons of fertilizer, 33110 quintals of seeds available in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.