शिराळा तालुक्यात ३८ गावांमध्ये ६९ नवीन कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:10+5:302021-05-21T04:28:10+5:30
शिराळा : तालुक्यात गुरुवारी ३८ गावांमध्ये ६९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सागाव ही तीन ...
शिराळा
: तालुक्यात गुरुवारी ३८ गावांमध्ये ६९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिराळा, मांगले, सागाव ही तीन गावे हॉटस्पॉट बनली आहेत. एकूण रुग्णांपैकी ८६.५० टक्के रुग्ण गृह विलगीकरण कक्षात उपचार घेत आहेत. सागाव ५, चिंचोली, कोकरूड, पणुंब्रे वारूण, उपवळे प्रत्येकी ४, बिऊर, चिखली, पाडळेवाडी, तडवळे प्रत्येकी ३, शिराळा, अंत्री बुद्रुक, ढानकेवाडी, गुंडगेवाडी, कणदूर, मांगले, नाटोली, निगडी प्रत्येकी २, आरळा, औढी, बांबवडे, चरण, चिखलवाडी, धामवडे, हप्पेवाडी, इंग्रुळ, काळुंद्रे, किनरेवाडी, लादेवाडी, नाठवडे, पाचगणी, पाडळी, पावलेवाडी, पेठ, फुपिरे, सावर्डे, विरवाडी, वाकुर्डे बुद्रुक प्रत्येकी १ असे रुग्ण आहेत.
एकूण ७६३ सक्रिय रुग्ण असून, गृह विलगीकरणात ६६०, शिराळा संस्था विलगीकरण कक्ष १३, उपजिल्हा रुग्णालय ४०, कोकरूड ग्रामीण रुग्णालय २५, स्वस्तिक कोविड सेंटर १९, मिरज कोविड रुग्णालय २, खासगी रुग्णालय ४ असे रुग्ण उपचार घेत आहेत.