मिरजेतील काँग्रेसचे ७० टक्के उमेदवार निश्चित
By admin | Published: February 4, 2017 12:12 AM2017-02-04T00:12:54+5:302017-02-04T00:12:54+5:30
जिल्हा परिषद : जयश्रीताई, प्रतीक, विशाल पाटील यांच्या बैठकीत निर्णय; आज पुन्हा सांगलीत बैठक
सांगली : मिरज तालुक्यातील ११ जिल्हा परिषद गट आणि २२ पंचायत समिती गणांपैकी काँग्रेसच्या ७० टक्के उमेदवारांची नावे माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई मदन पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शुक्रवारी (दि. ३) निश्चित केली आहेत. उर्वरित नावे निश्चित करण्यासाठी शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे.
सांगलीतील जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर शुक्रवारी काँग्रेसच्या वसंतदादा-मदनभाऊ गटांची बैठक झाली. या बैठकीस प्रतीक पाटील, विशाल पाटील, संग्राम पाटील, सोनीचे दिनकर पाटील यांच्यासह मिरज तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीमध्ये कसबे डिग्रज जिल्हा परिषद गटातून सरपंच विशाल श्रीपाल चौगुले यांच्या नावावर सर्वच नेत्यांचे एकमत झाले. कवठेपिरान पंचायत समिती गणातून अनिल आमटवणे यांचेही नाव निश्चित झाले.
समडोळी पंचायत समिती गण खुला असल्यामुळे येथून इच्छुकांची संख्या जास्त आहे. संजय सावंत आणि अशोक मोहिते यांच्या नावावर चर्चा झाली. सावंत यांना उमेदवारी देण्यास प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी सहमती दर्शविली आहे. एरंडोली जिल्हा परिषद गटात जयश्री तानाजी पाटील आणि संगीता खुळे-पाटील यांच्यामध्ये उमेदवारी मिळविण्यावरून स्पर्धा आहे. यातील एक गट नाराज होणार असल्याने नेत्यांनी येथील उमेदवारी जाहीर करण्याचे टाळून, शनिवारी निर्णय घेण्याचे ठरले.
भोसे जिल्हा परिषद गटातून माजी सरपंच शीतल पाटील यांची पत्नी मीनाक्षी पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. सोनी पंचायत समिती गणातून दिनकर पाटील समर्थक रंगराव जाधव यांच्या उमेदवारीलाही हिरवा कंदील दाखवण्यात आला.
एरंडोली, भोसे, नांद्रे, सोनी, सलगरे, कवठेपिरान, समडोळी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या नऊ जागा जयश्रीताई पाटील यांच्या म्हणजे मदनभाऊ गटाला दिल्या आहेत. उर्वरित सर्व जागांचे निर्णय प्रतीक पाटील आणि विशाल पाटील घेणार आहेत. त्यांचेही उमेदवार निश्चित आहेत. पण, बंडखोरी टाळण्यासाठी नावे गोपनीय ठेवली आहेत. काही नावांवर जयश्रीताई आणि प्रतीक पाटील यांचे एकमत झालेले नाही. उर्वरित जागांसाठी शनिवारी पुन्हा प्रतीक पाटील, जयश्रीताई आणि विशाल पाटील यांची बैठक होणार आहे. त्यात नावे निश्चित करण्यात येणार आहेत.
विशाल पाटील कोण, हे दाखवून देऊ..