पालकमंत्र्यांमुळे ७०० कोटींचा निधी
By admin | Published: May 3, 2017 01:18 AM2017-05-03T01:18:30+5:302017-05-03T01:18:30+5:30
भाजप-ताराराणी आघाडीचा दावा : काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेली टीका निरर्थक, अविचारी
कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गेल्या अडीच वर्षांत शहरासाठी ७०० ते ७५० कोटींचा निधी खेचून आणला आहे, असा दावा महानगरपालिकेतील भाजप व ताराराणी आघाडीतर्फे करण्यात आला. दादांसारख्या निष्कलंक व विकासाची दृष्टी असलेल्या नेत्यावर कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेली टीका ही निरर्थक व अविचारी असल्याचे यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या अंदाजपत्रकातील त्रुटी दाखवून दिल्यानंतर आणि या कामात घोटाळा झाल्याचा आरोप केल्यानंतर महापालिकेतील कॉँग्रेसच्या नगरसेवकांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरासाठी काय केले, त्यांनी किती निधी आणला, पालिकेच्या कामांसाठी किती वेळ दिला, असे सवाल उपस्थित केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधी पक्षनेते किरण शिराळे, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षांत किती निधी आणला, याची यादीच जाहीर केली.
पालकमंत्री पाटील यांनी शहरासाठी आणलेल्या निधीची यादी आणि त्यांनी लावलेल्या कामांचा धडाका पाहिला तर ते शहरासाठी वेळ देत नाहीत, असे म्हणणे गैर आणि बालबुद्धीचे आहे. उलट ही कामे पूर्ण झाली तर त्याचे श्रेय चंद्रकांतदादा पाटील व पर्यायाने भाजपला मिळेल म्हणून महापालिकेतील कॉँग्रेसचे नेते व नगरसेवक त्यांची भेट घेण्याचे टाळत आहेत. शहराचा सर्वांगीण विकास, पर्यटनवाढ व शहराचे सौैंदर्यीकरण करून कोल्हापूर हे श्रीमंत शहर बनविण्याच्या दादांच्या स्वप्नातील विकासाचे साक्षीदार होणार असाल तर मोठ्या मनाने आजपर्यंत झालेला, होत असलेला विकास खिलाडूवृत्तीने मान्य करून, नवनवीन संकल्पना घेऊन लेखी पत्राने विनंती केल्यास पालकमंत्री नक्कीच वेळ देतील, असे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी आणलेल्या निधीची यादी
शहर टोलमुक्तीसाठी- ४५० कोटी नगरोत्थान- ५ कोटी दलित वस्ती- १.५० कोटी दलितेतर- ७.४० कोटी पूरहानी- २.८० कोटी मनपा विशेष निधी- २० कोटी अमृत योजना- ७२ कोटी शास्त्रीनगर क्रीडांगण विकास- ३ कोटी शहरांतर्गत विद्युत कामे- २२ कोटी चित्रनगरी विविध कामे- २८ कोटी शाहू जन्मस्थळ- २.१० कोटी राजाराम महाविद्यालय इमारत बांधकाम- ३.८१ कोटी शहरातील रिंग रोड- ६१ कोटी मेडिकल कॉलेज, शेंडा पार्क- ७१.२७ कोटी बस खरेदी दुसरा हप्ता- ३.८८ कोटी नावीन्यपूर्ण योजना- १.२५ कोटी.