गणेशोत्सवात जन्मणाऱ्या मुलीच्या नावे ७ हजारांची ठेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:24+5:302021-09-10T04:32:24+5:30

टाकळी : बेडग (ता. मिरज) येथे गणेशोत्सव कालावधीत जन्मलेल्या मुलीच्या नावे सात हजार रुपयांची ठेव ठेवली जाणार आहे. गणराज ...

7,000 deposit in the name of a girl born in Ganeshotsav | गणेशोत्सवात जन्मणाऱ्या मुलीच्या नावे ७ हजारांची ठेव

गणेशोत्सवात जन्मणाऱ्या मुलीच्या नावे ७ हजारांची ठेव

Next

टाकळी : बेडग (ता. मिरज) येथे गणेशोत्सव कालावधीत जन्मलेल्या मुलीच्या नावे सात हजार रुपयांची ठेव ठेवली जाणार आहे. गणराज गणेशोत्सव मंडळाने त्यासाठी गणराज सुकन्या समृद्धी योजना जाहीर केली. योजनेचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. चार निराधारांना मासिक निवृत्तिवेतनही दिले जाणार आहे.

सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या या मंडळाने पाच वर्षांपासून सुकन्या समृद्धी ठेव योजना सुरू केली आहे. गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांत गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे सात हजारांची मुदत ठेव ठेवली जाणार आहे. १७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत योजना लागू राहील. बेडगची माहेरवाशीण किंवा सून या दोहोंना हा लाभ मिळेल. यासाठी मंडळाचे कार्यकर्ते धनराज बुरसे यांनी पुढाकार घेतला आहे. मंडळातर्फे चार निराधार वृद्ध महिलांना निवृत्तिवेतन दिले जाणार आहे. प्रत्येक महिन्याला ५०० रुपये दिले जातील. या योजनेचे यंदा तिसरे वर्ष आहे, असे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी म्हणाले.

Web Title: 7,000 deposit in the name of a girl born in Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.