सांगलीतील डफळापूरच्या द्राक्षबागायतदारास ७२ लाखांचा गंडा, व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
By श्रीनिवास नागे | Published: July 8, 2023 12:56 PM2023-07-08T12:56:28+5:302023-07-08T12:57:52+5:30
मालाचे पैसे परत देतो असे सांगून माल घेऊन गेला. अन्..
जत : डफळापूर (ता. जत) येथील शेतकऱ्याची द्राक्षे विकत घेऊन पैसे परत देतो म्हणून ७१ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा गंडा घालण्यात आला. रमेश सुभाष गायकवाड (वय ४५, रा. डफळापूर, ता. जत ) असे शेतकऱ्याचे नाव असून मार्च ते एप्रिलदरम्यान वेळोवेळी त्यांनी व्यापाऱ्याकडे पैशाची मागणी केली. मात्र, त्याने पैसे दिले नाहीत.
याबाबत जत पोलिस ठाण्यात रमेश गायकवाड यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शशांक शामराव सरगर (रा. खलाटी, ता. जत) याच्या विरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सरगर याच्यविरुद्ध ही तिसरी तक्रार दाखल झाली आहे.
डफळापूर हद्दीत गायकवाड यांची द्राक्षबाग आहे. दरवर्षी ते द्राक्षाचे चांगले उत्पादन घेतात. सरगर द्राक्ष व्यापार करतो. याने गायकवाड यांची बाग पाहून माल खरेदी केला. दरम्यान, मालाचे पैसे परत देतो असे सांगून माल घेऊन गेला.
काही दिवसानंतर रमेश गायकवाड यांनी सरगरकडे मालाचे पैसे देण्यासाठी तगादा लावला. मात्र, वेळोवेळी त्याने पैसे देतो, असे सांगत त्यांची फसवणूक केली. त्यामुळे गायकवाड यांनी जत पोलिस ठाण्यात सरगरविरोधात फसवणूक केल्याची तक्रार दिली. सरगर याच्यविरुद्ध ही तिसरी तक्रार दाखल झाली आहे.