सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 7.6 मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:01 PM2020-06-20T17:01:04+5:302020-06-20T17:03:31+5:30

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 7.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

7.6 min in Shirala taluka in Sangli district. I Rainfall record | सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 7.6 मि. मी. पावसाची नोंद

सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 7.6 मि. मी. पावसाची नोंद

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात 7.6 मि. मी. पावसाची नोंदवारणा धरणात 13.40 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.1 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 7.6 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

मिरज 6.2 (82.3), जत 0.1 (57), खानापूर-विटा 0.00 (125), वाळवा-इस्लामपूर 0.2 (142.4), तासगाव 5.1 (88.3), शिराळा 7.6 (304.3), आटपाडी 1.7 (93.9), कवठेमहांकाळ 0.2 (96.4), पलूस 0.00 (105.2), कडेगाव 0.00 (113.2).

वारणा धरणात 13.40 टी.एम.सी. पाणीसाठा

सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 13.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.

शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 34.37 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.60 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 2.29 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 5.71 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 2.19 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 9.21 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 2.33 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 44.89 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडलेला विसर्ग क्युसेक्स मध्ये पुढीलप्रमाणे.

वारणा 1000, कोयना 2100, कण्हेर 100, दूधगंगा 625, राधानगरी 1908, उरमोडी 800, तारळी 370, अलमट्टी 530. विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा पूल कराड 8.5 (45), आयर्विन पूल सांगली 10.3 (40) व अंकली पूल हरिपूर 14.5 (45.11).

धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून पडलेला पाऊस मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे.

कोयना 34 (661), धोम 0.00 (171), कण्हेर 1 (147), वारणा 4 (434), दूधगंगा 18 (766), राधानगरी 49 (864), उरमोडी 1 (262), तारळी 7 (270).
 

Web Title: 7.6 min in Shirala taluka in Sangli district. I Rainfall record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.