सांगलीत आठशे गणेशमूर्ती दान, गणेशभक्तांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘डॉल्फिन’, ‘रोटरी’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 09:17 PM2017-08-31T21:17:21+5:302017-08-31T21:18:12+5:30

जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करु नये, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या प्रबोधनाला चांगले यश आले आहे. सातव्यादिवशी तब्बल आठशे गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान झाल्या आहेत. तब्बल सात टन निर्माल्य संकलन झाले आहे. मूर्ती दानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

8 Ganesh idols donated in Sangli, spontaneous response from Ganesh devotees; 'Dolphin', 'Rotary' venture | सांगलीत आठशे गणेशमूर्ती दान, गणेशभक्तांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘डॉल्फिन’, ‘रोटरी’चा उपक्रम

सांगलीत आठशे गणेशमूर्ती दान, गणेशभक्तांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद; ‘डॉल्फिन’, ‘रोटरी’चा उपक्रम

Next

सांगली, दि. 31 - जलप्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करु नये, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या प्रबोधनाला चांगले यश आले आहे. सातव्यादिवशी तब्बल आठशे गणेशमूर्ती त्यांच्याकडे दान झाल्या आहेत. तब्बल सात टन निर्माल्य संकलन झाले आहे. मूर्ती दानाचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 
डॉल्फिन नेचर ग्रुप व रोटरी क्लब कृष्ण व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्ती दान हा उपक्रम पाचव्यादिवशीही राबविण्यात आला होता. गणेशभक्तांमधून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत शंभर मूर्ती दान झाल्या होत्या. गुरुवारी उपक्रम आणखी चांगल्याप्रकार राबविण्यात आला. दोन्ही संस्थाचे पदाधिकारी मूर्ती व निर्माल्य पाण्यात विसर्जन करुन जलप्रदूषण करु नका, असे आवाहन करीत होते. ‘मूर्ती दान’ व ‘निर्माल्य संकलन’ असे फलक लाऊन उभा होते. कार्यकर्ते पर्यावरण व जलप्रदूषणाबाबत गणेशभक्तांचे प्रबोधन करीत होते. त्यामुळे गणेश भक्तांनीही या उपक्रमास चांगला प्रतिसाद दिला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाचशे मूर्ती दान झाल्या. नेमीनाथनगर येथे महापालिकेने विसर्जनासाठी कुंड ठेवले होते. याठिकाणीही शंभर मूर्ती दान झाल्या. 
डॉल्फिनचे प्रा. शशिकांत ऐनापूरे म्हणाले, कुपवाड येथील कापसे प्लॉटमधील गणेश मूर्तीकाराशी संपर्क साधून दान झालेल्या मूर्ती त्यांच्याकडे ठेवण्याची व्यवस्था केली आहे. जा भक्तांनी मूर्ती दान केल्या, त्यांना पुढील वर्षी पाहिजे असतील तर त्यांना देण्याची सोय केली आहे. मूर्तीला संबंधित भक्ताच्या नावाचे लेबल लावले आहे. ज्यांना मूर्ती नको आहेत, त्या मूर्र्तींना पुन्हा नव्याने रंग लाऊन कमी-जास्त दराने विक्री केली जाणार आहे. नवव्यादिवशीही हा उपक्रम राबविला जाणार आहे. 
प्रा. शाशिकांत ऐनापूरे यांची ‘टीम’ दुपारी चारपासून नदीकाढी हातात ‘निर्माल्य येथे द्या’, असे फलक घेऊन उभा होते. कार्याध्यक्ष अरुण कांबळे, सचिव डॉ. पद्मजा पाटील, राहूल साळुंखे, वैभव सोळस्कर, दिनेश पाटील, अर्चना ऐनापूरे, सचिन चोपडे, लक्ष्मण भट, विकास सावंत, अविष्कार माळी, विकास आवळे, नित्या पाटील, आदिती कुंभोजकर, ओमकार पाटील, असीफ मुजावर, पवण भोकरे, उज्वल साठे सहभागी झाले होते.

Web Title: 8 Ganesh idols donated in Sangli, spontaneous response from Ganesh devotees; 'Dolphin', 'Rotary' venture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.