जिल्ह्यात ८०३ नवे रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:41+5:302021-07-24T04:17:41+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारीही घट होताना दिवसभरात नवीन ८०३ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे ...

803 new patients in the district; 23 killed | जिल्ह्यात ८०३ नवे रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ८०३ नवे रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारीही घट होताना दिवसभरात नवीन ८०३ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढले असून परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत ११९० जण कोरोनामुक्त झाले.

जिल्ह्यात रुग्णसंख्या घटत असल्याने दिलासा मिळत असला तरी मृत्यूचे प्रमाण कायम आहे. जिल्ह्यातील २० जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, मिरज १, वाळवा तालुक्यात ६, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी ३, कडेगाव २, आटपाडी, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआर अंतर्गत ४६६७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३२५ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ७३४९ जणांच्या चाचणीतून ४९५ पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेत असलेल्या ९४८४ जणांपैकी ९५३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७९५ जण ऑक्सिजनवर तर १५८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांच्या मृत्यूसह नवे १७ जण उपचारासाठी दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १६८९२६

उपचार घेत असलेले ९४८४

कोरोनामुक्त झालेले १५४९६४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४४७८

पॉझिटिव्हिटी रेट ६.९६

शुक्रवारी दिवसभरात

सांगली ११३

मिरज ३०

आटपाडी ५२

कडेगाव २७

खानापूर ७४

पलूस ६६

तासगाव ६१

जत ९१

कवठेमहांकाळ ३०

मिरज तालुका १०५

शिराळा ३७

वाळवा ११७

Web Title: 803 new patients in the district; 23 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.